ETV Bharat / state

कोल्हापूर : राम मंदिर पूर्ण झाल्यानंतरच होणार स्वप्न पूर्ण, २७ वर्षानंतर 'तो' आजही अनवाणी - ram temple effect kolhapur news

शिये गावातील निवास पाटील यांनी जोपर्यंत आयोध्येत राममंदिर होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा संकल्प केला होता. या संकल्पानंतर गेली 27 वर्ष निवास पाटील अनवाणी फिरत आहेत. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणीचा सोहळा संपन्न झाला. मात्र, जोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत माझे पण सुरुच राहील असे पाटील यांनी सांगितले.

राम मंदिर पूर्ण झाल्यानंतरचं माझे स्वप्न पूर्ण

author img

By

Published : Aug 5, 2020, 7:58 PM IST

कोल्हापूर : जोपर्यंत अयोध्येमध्ये रामचंद्रांचे मंदिर होणार नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. असा संकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील निवास पाटील यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाने पाटील यांचा 27 वर्षाचा संकल्प आता पूर्ण होणार असे वाटत होते. तर, आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणीचा सोहळा संपन्न झाला. मात्र, पाटील यांनी जोपर्यंत मंदिर पूर्ण होत नाही तोपर्यंत माझे पण सुरुच राहील असे सांगितले. निवास पाटील यांच्या या श्रद्धेचे आणि जिद्दीचे कौतुक परिसरात होत आहे.

अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी 1989 व त्यानंतर 1992 ला मोठी आंदोलने झाली. यात देशभरातील हजारो कार सेवकांनी भाग घेतला होता. कोल्हापूर जिल्ह्यातुनही शेकडो तरुण त्यावेळी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यापैकीच एक म्हणजे शिये गावातील निवास पाटील. विश्वहिंदू परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या निवास पाटील यांनी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि 1992 ला अयोध्येत घडलेल्या घटनेचे ते साक्षीदार बनले. यावेळी झालेला रक्तपात पाहून निवास पाटील यांनी जोपर्यंत आयोध्येत राममंदिर होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा संकल्प केला होता. या संकल्पानंतर गेली 27 वर्ष निवास पाटील अनवाणी फिरत आहेत. दैनंदिन कामे, शेतातील कामांबरोबरच गडकोट भ्रमतींसाठीही ते अनवणीच जात आहेत.

रामचंद्रावर श्रद्धा ठेवून हे अखंडितपणे माझं संकल्प सुरू ठेवू शकल्याचं संगतानाच न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आता कुटुंबासह राममंदिर उभारणीत खारीचा वाटा उचलण्याची पाटील यांची इच्छा आहे. निवास पाटील यांच्या त्यागाचा कुटुंबीयांना अभिमान आहे. लग्नातही चप्पल न घालणाऱ्या पतीला न्यायालयाच्या निर्णयानंतर आता चप्पल घालायला मिळणार याचे समाधान त्यांच्या पत्नीला आहे. निवास पाटील यांनी ज्या श्रद्धेने आणि जिद्दीने 27 वर्ष आपला संकल्प सुरू ठेवला त्याचं कौतुक आता परिसरातून होतं आहे. तर न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेकांनी त्यांचा सत्कार करत त्यांना चप्पल देऊन ते तू घाल अशी विनंती केली आहे. मात्र मंदिराची इमारत पूर्ण होत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याचा पाटील यांचा संकल्प कायम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.