ETV Bharat / state

'विन लकी' गेमच्या नावाने कोल्हापूरसह जिल्ह्यात ऑनलाईन कॅसिनोचा सुळसुळाट ! - win lucky game kolhapur ETV

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या, मटका धद्यांवर कारवाई करत कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची पाळेमुळे शोधून काढून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच त्याची जागा आता हे ऑनलाईन कॅसिनो घेत आहेत. शहरासह जिल्ह्यात 50 हुन अधिक ठिकाणी ऑनलाईन कॅसिनो हा नवा जुगाराचा धंदा जोरात सुरू झाला आहे. या गेमच्या माध्यमातून दिवसाकाठी कोट्यवधींची उलाढाल होत आहे. हा ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांना सुरुवातीला कॅसिनोमध्ये गेल्यावर ज्या प्रमाणे पैसे देऊन कॉईन देतात त्या प्रमाणे जितक्या पैशाने खेळणार आहे, तितका बॅलन्स त्या गेमवर दिला जातो.

'विन लकी' गेमच्या नावाने कोल्हापूरसह जिल्ह्यात ऑनलाईन कॅसिनोचा सुळसुळाट !
author img

By

Published : Sep 26, 2019, 3:32 PM IST

Updated : Sep 27, 2019, 1:47 PM IST

कोल्हापूर - 'विन लकी गेम' नावाने शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन कॅसिनोने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. दररोज कोट्यवधींची उलाढाल ऑनलाईन गेमच्या या नवीन जुगारामुळे शहरात होत आहे. शहरात 7 ते 8 ठिकाणी आणि जिल्ह्यात असे 50 हुन अधिक ठिकाणी हे ऑनलाईन कॅसिनो सुरू आहेत. तर याच्या पाठीमागचा मास्टर माईंड कोण आहे ? आणि हे अवैध धंदे कोणाच्या पाठबळावर सुरू आहेत याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना या अवैद्य धंदे यांच्याबद्दल माहिती आहे. मात्र, तरीदेखील कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

'विन लकी' गेमच्या नावाने कोल्हापूरसह जिल्ह्यात ऑनलाईन कॅसिनोचा सुळसुळाट !

हेही वाचा - पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या, मटका धद्यांवर कारवाई करत कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची पाळेमुळे शोधून काढून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच त्याची जागा आता हे ऑनलाईन कॅसिनो घेत आहेत. शहरासह जिल्ह्यात 50 हुन अधिक ठिकाणी ऑनलाईन कॅसिनो हा नवा जुगाराचा धंदा जोरात सुरू झाला आहे. या गेमच्या माध्यमातून दिवसाकाठी कोट्यवधींची उलाढाल होत आहे. हा ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांना सुरुवातीला कॅसिनोमध्ये गेल्यावर ज्या प्रमाणे पैसे देऊन कॉईन देतात त्या प्रमाणे जितक्या पैशाने खेळणार आहे, तितका बॅलन्स त्या गेमवर दिला जातो.

हेही वाचा - आमदारांनी राजीनामे दिले, मी फक्त स्वीकारण्याच काम केले - हरीभाऊ बागडे

गेममध्ये 0 ते 36 पर्यंतचे असे 37 आकडे असतात. त्यातल्या एकापेक्षा जास्त नंबरवर एकाच वेळी आपण पैसे लावू शकतो. यासाठी प्रत्येक राउंडला 40 सेकंद असा यामध्ये वेळ असतो. 40 सेकंदामध्ये आपल्याला वाटतो, त्या नंबरवर पैसे लावू शकतो. त्यानंतर आपोआप एक नंबर निघतो तो जर आपण लावलेल्या नंबरसोबत जुळला तर लावलेल्या पैशांच्या नऊ पटीने पैसे आपल्या बॅलन्स मध्ये जमा होतात. आपल्याला हवे तेव्हा हा गेम बंद करून या एजंटकरून आपल्या बॅलन्समधून ही रक्कम घेऊ शकतो.

हेही वाचा - गोगाबाबा टेकडीवर गळा आवळून तरुणाची हत्या, 15 दिवसापूर्वीच झाला होता विवाह

शहरातील स्टँड, तावडे हॉटेल, लक्ष्मीपुरी, गांधीनगरसह कोडोली, शिणोळी, वडगाव, इचलकरंजी, आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, जोतीबा, केर्ली, आदी ठिकाणी हे अवैध धंदे सुरू आहेत. तर या गेममागे मंगेश नावाचा व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व पाहण्यासाठी मंगेशने अकबर नावाच्या व्यक्तीला मॅनेजर म्हणून ठेवला असल्याचीही माहिती समोर आली आहे.

'विन लकी गेम' प्रमाणेच 'सुपर 7' नावाचा सुद्धा गेम काही ठिकाणी सुरू -

'विन लकी गेम' प्रमाणेच 'सुपर 7' नावाचा गेम सुद्धा काही ठिकाणी सुरू आहे. संजय नावाचा व्यक्तीमार्फत हा गेम चालत आहे. शहरात त्याची 5 ते 6 दुकाने आहेत. हा गेम सुद्धा अशाच पद्धतीने खेळला जात आहे. अशा या ऑनलाईन गेमच्या नावाने ऑनलाईन कॅसिनोचा सुळसुळाट सुरू आहे. वेळीच या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांसह नागरिकांकडून होत आहे. कितीही सोनेरी मुलामा चढवला तरी हा जुगार आहे. या ठिकाणी नवीन जाणाऱ्याला याचे व्यसन लागू शकते तर अनेकांना याचे व्यसन लागले आहे. यामुळे शहरातील कित्येक कुटुंबे उद्धस्त होत आहेत. त्यामुळे वेळीच ऑनलाईन कॅसिनो या अवैध धंद्याची पाळेमुळे नष्ट करून हे धंदे चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Intro:(व्हिडिओ मधल्या सर्वांचे चेहरे ब्लर करा... बातमीत काही बदल करू नका, काही शंका वाटल्यास cl करा)

अँकर : 'विन लकी गेम' नावाने कोल्हापूरसह जिल्ह्यात ऑनलाईन कॅसिनोने चांगलेच आपले पाय रोवले आहेत. दररोज कोट्यवधींची उलाढाल ऑनलाईन गेम च्या या नवीन जुगारामुळे शहरात होत आहे. शहरात 7 ते 8 ठिकाणी आणि जिल्ह्यात असे 50 हुन अधिक ठिकाणी हे ऑनलाईन कॅसिनो सुरू असून यांच्यापाठीमागचा मास्टर माईंड कोण आणि हे अवैध धंदे कोणाच्या पाठबळावर सुरू आहेत याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे पोलिसांना या अवैद्य धंदे यांच्याबद्दल माहिती असूनही कारवाई का होत नाही असा सवाल सुद्धा काही नागरिक करत आहेत. Body:व्हीओ : जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मटका धद्यांवर कारवाई करत कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची पाळेमुळे शोधून काढून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच त्याची जागा आता हे ऑनलाईन कॅसिनो घेत आहेत. शहरासह जिल्ह्यात 50 हुन अधिक ठिकाणी ऑनलाईन कॅसिनो हा नवा जुगाराचा धंदा जोरात सुरू झाला आहे. या गेमच्या माध्यमातून दिवसाकाठी कोट्यवधींची उलाढाल होत आहे. हा ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांना सुरुवातीला एखाद्या कॅसिनोमध्ये गेल्यावर ज्या प्रमाणे पैसे देऊन कॉईन देतात त्या प्रमाणे जेव्हड्या पैशाने खेळणार आहे तेव्हढ्याचा बॅलन्स त्या गेमवर दिला जातो. गेम मध्ये 0 ते 36 पर्यंतचे असे 37 आकडे असतात त्यातल्या एकापेक्षा जास्त नंबरवर एकाच वेळी आपण पैसे लावू शकतो. यासाठी प्रत्येक राउंडला 40 सेकंद असा यामध्ये वेळ असतो. 40 सेकंदामध्ये आपल्याला वाटतो त्या नंबरवर पैसे लावू शकतो. त्यानंतर आपोआप एक नंबर निघतो तो जर आपण लावलेल्या नंबरसोबत जुळला तर लावलेल्या पैशांच्या नऊ पटीने पैसे आपल्या बॅलन्स मध्ये जमा होतात. आपल्याला हवे तेंव्हा हा गेम बंद करून या एजंटकरून आपल्या बॅलन्समधून ही रक्कम घेऊ शकतो. कोल्हापूर शहरातील स्टँड, तावडे हॉटेल, लक्ष्मीपुरी, गांधीनगरसह कोडोली, शिणोळी, वडगाव, इचलकरंजी, आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, जोतीबा, केर्ली, आदी ठिकाणी हे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विन लकी गेम मंगेश नावाच्या व्यक्तीकडून जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती समोर आली असून अनेक ठिकाणी त्यांनी या अवैध धंद्यासाठी आपले एजंट नेमले आहेत. हे सर्व पाहण्यासाठी मंगेशने अकबर नावाच्या व्यक्तीला मॅनेजर म्हणून ठेवला असल्याचीही माहिती समोर आली आहे.

*'विन लकी गेम' प्रमाणेच 'सुपर 7' नावाची सुद्धा गेम काही ठिकाणी सुरू*

'विन लकी गेम' प्रमाणेच 'सुपर 7' नावाच्या गेम सुद्धा काही ठिकाणी सुरू आहेत. संजय नावाचा व्यक्ती हा गेम चालवत असून शहरात त्याची 5 ते 6 दुकानं आहेत. हा गेम सुद्धा अशाच पद्धतीने खेळला जात आहे. अशा या ऑनलाईन गेमच्या नावाने ऑनलाईन कॅसिनोचा सुळसुळाट सुरू असून वेळीच या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांसह नागरिकांकडून होत आहे. कितीही सोनेरी मुलामा चढवला तरी हा जुगार आहे. या ठिकाणी नवीन जाणाऱ्याला याचे व्यसन लागू शकते तर अनेकांना याचे व्यसन लागले आहे. अशी व्यसनं लागलेली आणि त्यामुळे बरबाद झालेली कित्येक कुटुंबांची उदाहरणे आता कोल्हापूरात आहेत. त्यामुळे वेळीच ऑनलाईन कॅसिनो या अवैध धंद्याची पाळेमुळे नष्ट करून हे धंदे चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.Conclusion:.
Last Updated : Sep 27, 2019, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.