कोल्हापूर: राधानगरी अभयारण्यात प्राण्याची शिकार करुन मांसाची वाटणी करताना तिघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यामध्ये कोंडीबा तुकाराम डवर (59), राजेंद्र भरत पाटील (47) आणि ओंकार बळवंत पताडे ( 21) सर्व रा. सावर्धन ता. राधानगरी यांचा समावेश आहे. त्यांनी भेकराची शिकार केल्याचा संशय आहे. भेकर प्राण्याच्या शिकारीची घटना समोर येताच राधानगरी अभयारण्य परिसरातील प्राणी सुरक्षित नाहीत का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. अशाच शिकारीच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आलेल्या आहेत. आज पुन्हा ही घटना समोर आल्याने प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वन्यजीव विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणीही प्राणिमित्रांकडून करण्यात आली आहे.
Exclusive : राधानगरी अभयारण्यात शिकार; मांसाची वाटणी करताना तिघे रंगेहात - शिकार
राधानगरी अभयारण्यात (Radhanagari Sanctuary) शिकार (Hunting) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना शिकारीनंतर मांसाची वाटणी करत असताना रंगेहात (Three arrested while distributing meat) पकडले आहे.