कोल्हापूर - गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव ते सामनगड या दरम्यान रविवारी (१ सप्टेंबर) घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शर्यतीत दोन घोडा गाड्यांचा अपघात झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हे ही वाचा - कांदिवली येथून श्रीवर्धनकडे येणाऱ्या चाकरमान्यांच्या खासगी मिनीबसला अपघात
गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव ते सामनगड या दरम्यान दरवर्षी घोडागाडी स्पर्धा भरवली जाते. यावर्षीही ही स्पर्धा भरवली होती. पण या स्पर्धेवेळी स्पर्धा मार्गाच्या एका तीव्र वळणावर घोड्याचा पाय घसरल्यामुळे गाडी घसरली. त्यानंतर मागून येणारी गाडीही घसरली. मात्र, ही घटना घडल्यानंतरही घोड्यांनी आपला तोल सांभाळून पुन्हा या स्पर्धेत भाग घेऊन शर्यत पूर्ण केली. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हे ही वाचा - कोल्हापुरात दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल