मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनी एका व्यक्तीने औरंगजेबाचे स्टेट्स ठेवले. या पोस्टमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पण या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत. गृह मंत्रालयाने कोल्हापूरमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे.
गृहमंत्रालयाचे परिस्थितीवर लक्ष : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये आपण कोल्हापुरातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले होते. दरम्यान गृहमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आल्याचे सांगितले.
कोल्हापूर बंद ठेवण्याची हाक : महाराष्ट्रासह देशभरात 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. पण राज्यातील राज्याभिषेक सोहळ्याला गालबोट लागले. राज्याभिषेक दिनानिमित्त अनेक शिवभक्तांनी सोशल मीडियावर स्टेटसला फोटो, व्हिडिओ पोस्ट केले. याच दरम्यान एका व्यक्तीने औरंगजेबाचे स्टेट्स ठेवले. या पोस्टमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. यापार्श्वभूमीवर कोल्हापुरात तणावाचे वातावरण आहे.औरंगजेबचे स्टेट्स ठेवल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंद ठेवण्याची हाक हिंदुत्त्ववादी संघटनांनी दिली होती.
अहमदनगरमधील व्यक्तीने पोस्ट केला फोटो : यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अहमदनगरमध्ये एका व्यक्तीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोशल मीडियावर औरंगजेबाचा फोटो पोस्ट केला. या व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट अनेकांनी पाहिली आणि ती थोड्याच वेळात व्हायरल झाली. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी औरंगजेबाचा फोटो पोस्ट केल्याने अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. याचा निषेध म्हणून विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून पुणे, कोल्हापूर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूरमध्ये देखील निदर्शन करण्यासाठी मोर्चा आयोजित केला गेला होता. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केली.
म्हणून झाला लाठीचार्ज : पोलिसांनी जमाबंदी लागू केलेली असताना देखील कोल्हापुरात अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या निषेध मोर्चात सहभागी झालेले हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मागे हटत नव्हते. परिणामी पोलिसांना बाळाचा वापर करून लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी लाटीचार्ज केल्यामुळे कोल्हापूरमधील परिस्थिती चिघगळली आणि या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गृह विभागाने कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद केली आहे.
हेही वाचा -