ETV Bharat / state

Shahi Dussehra Celebration : ऐतिहासिक परंपरा असलेला कोल्हापूरचा 'शाही दसरा' थाटात साजरा...पाहा व्हिडिओ - Dussehra Festival In Kolhapur

Shahi Dussehra celebration: छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीर नगरीत (Karveer Nagri) पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा (Shahi Dussehra celebration) दिमाखात साजरा झाला. यावर्षीचा शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात आणि अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.

Shahi Dussehra celebration
शाही दसरा थाटात साजरा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 10:42 PM IST

कोल्हापूर Shahi Dussehra celebration : आनंद, उत्साह आणि परंपरा जपत कोल्हापूरचा 'शाही दसरा' (Shahi Dussehra) सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या ऐतिहासिक शाही सोहळ्याला करवीरवासीयांनी उपस्थिती लावली होती. छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमी पूजन करून सीमोल्लंघन करण्यात आले. यावेळी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे, यशराजे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, (Chandrakant Patil) पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्रीशाहू महाराज छत्रपती यांचे दसरा चौकात आगमन : राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेल्या कोल्हापूरचा शाही दसऱ्यानिमित्त करवीर नगरी सजली होती. तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई (Karveer Nivasini Shree Ambabai) जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे शाही लवाजम्यासह मिरवणूक काढण्यात आली. या शाही मिरवणुकीत सजवलेले हत्ती, घोडे यांच्यासह पारंपरिक वेषभूषेतील मावळे सहभागी झाले होते. सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान श्रीशाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानाचे गीत वाजवून स्वागत केलं.

असा पार पडला दसरा सोहळा : भारतात म्हैसूरपाठोपाठ कोल्हापुरच्या शाही दसऱ्याला वेगळं वलय आहे. या सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या शामियानात छत्रपती घराण्यातील सदस्यांसह दरबारातील मानकरी, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मावळत्या सूर्याच्या साक्षीने 6 वाजून 4 मिनिटांनी करवीर संस्थांचे अधिपती श्रीमंत शाहू महाराज यांनी शमी पूजन केले. तसेच हवेत बंदुकीच्या फैरी झडल्यानंतर ऐतिहासिक दसरा चौकात जमलेल्या करवीरवासीयांनी सीमोल्लंघन करत सोने लुटले.

राज घराण्यातील सदस्यांना सोने देण्यासाठी गर्दी : सीमोल्लंघनाचा मुख्य सोहळा झाल्यानंतर राज घराण्यातील सदस्यांना सोने देण्यासाठी करवीरच्या जनतेने गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. शाही लवाजामसह आकर्षक मेबॅककार मधून दसरा चौक मैदानावर फेरफटका मारत जनतेच्या सोन्याचा छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजे यांनी स्वीकार केला. शाही लवाजम्यासह पुन्हा नवीन राजवाड्याकडे रवाना झाले आणि यानंतर गेली दहा दिवस चैतन्यांनी भरलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता झाली.

हेही वाचा -

  1. Shahi Dussehra २०२३ Kolhapur : भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा शाही दसरा कोल्हापुरात; तयारी पूर्ण
  2. Shahi Dussehra celebration : कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा दिमाखात साजरा; पहा सजवलेले उंट, घोडे, चित्ररथ
  3. Shahi Dussehra Satara : साताऱ्यात पुढील वर्षापासून शाही दसरा; पालकमंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.