कोल्हापूर - जिल्ह्यातील विविध भागात आज बुधवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय जिल्ह्यातील विविध भागात दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोमवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता. आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाल्यासह गुऱ्हाळ घरांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
शहरात रात्री ८ च्या सुमारास जोरदार पाऊस -
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असल्या तरी बुधवारी रात्री ८ नंतर जवळपास दीड तास पाऊस सुरू होता. अजूनही जिल्ह्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. ढगांच्या गडगडाटासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांचे नुकसान तर झाले असून असाच पाऊस सुरू राहिला तर आणखी नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा - बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर ५० टक्के सवलत मिळणार