कोल्हापूर - जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. धरण क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून एकूण 3 दरवाजांसह विद्युत विमोचकातून एकूण 5,684 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीची पाणी पातळीसुद्धा 33.7 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय राज्य आणि जिल्हा मार्ग मिळून जवळपास 12 वाहतूक मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहेत.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उद्यापर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी असून धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे लवकरच इशारा पातळीसुद्धा ओलांडण्याची शक्यता असून कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.
सध्या जिल्ह्यातील इतर धरणामधून पुढील प्रमाणे विसर्ग चालू आहे :
तुळशी - 328
वारणा - 12984
दुधगंगा - 4800
कासारी - 1750
कडवी - 1608
कुंभी - 350
पाटगाव - 00
चिकोत्रा - 00
चित्री - 1568
जंगमहट्टी - 335
घटप्रभा - 6331
जांभरे -1694
कोदे - 703