ETV Bharat / state

सध्या रेमडेसिवीर हेच कोरोनावरील रामबाण औषध, ग्रामविकास मंत्र्यांचा दावा

author img

By

Published : May 21, 2021, 5:14 PM IST

सध्या रेमडेसिवीर कोरोनावरील रामबाण औषध असल्याचे ग्रामविकास मंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी भातखळकर हे अॅपकॉन कंपनीचे एजंट आहेत का?, असा प्रश्न विचारला आहे.

Hassan Mushrif said that currently Remedesivir is the only drug on corona
सध्या रेमडीसिवीर हेच कोरोनावरील रामबाण औषध, ग्रामविकास मंत्र्यांचा दावा

कोल्हापूर - जागतिक आरोग्य विभागाने कोरोना वरील रेमडेसिवीर हे संजीवनी औषध नाही, अशी घोषणा केली आहे. मात्र, अद्याप कोरोना वरील उपाय कारक इंजेक्शन सापडलेले नाही. त्यामुळे रेमडेसिवीर हे कोरोना वरील संजीवनी ठरणारे औषध नसले, तरी ते कोरोनावर सध्यातरी रामबाण औषध आहे. त्यामुळे दिल्लीतील अधिकाऱ्यांनी एखाद्या कंपनीची सुपारी घेऊन एजंटगिरी करू नये. असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी लगावला आहे.

'जीवाशी खेळण्याचा प्रयत्न'-

मुश्रीफ पुढे म्हणाले, अरबी समुद्रात जे चक्रीवादळ झाले, त्याची माहिती आठ दिवसांपूर्वी हवामान खात्याने दिली होती. या वादळामुळे केरळ, गोवा, महाराष्ट्र, गुजरात राज्याच्या समुद्रकिनाऱ्याला मोठा धोका असल्याचे देखील हवामान खात्याने सांगितले होते. मात्र, बॉम्बे हाय मधील अॅपकॉन कंपनीने काम सुरु ठेवून कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. समुद्रात अडकलेल्या 189 नागरिकांना वाचवण्यात यश आले होते. तर 49 लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. याबद्दल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या कंपनीवर मनुष्यवधाचा खटला दाखल करावा अशी मागणी केली आहे. त्यावर भाजप पक्षाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली. वास्तविक हे आरोप करताना अतुल भातखळकरांना लाज वाटली पाहिजे. भातखळकर हे त्या कंपनीचे एजंट आहेत का?, असा सवाल मुश्रीफांनी केला. भाजपच्या नेत्यांना सत्ता गेल्यानेच अस्वस्थ वाटत आहे. म्हणून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

हेही वाचा - 'फोटोसेशनसाठी नव्हे, तर कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलोय'

'अंबानी स्फोटक प्रकरणात तपास पथक पुढील महिन्यात गाडीचा टायर पकडेल' -

पुढे मुश्रीफ म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक ठेवलेल्या प्रकरणात काल तपास पथकाने सहावी गाडी पकडली. पुढील महिन्यात एखाद्या गाडीचा टायर पकडतील असा टोला मुश्रीफ यांनी लगावला. या प्रकरणाला तीन महिने उलटूनही अद्याप खरे चेहरे समोर येत नाहीत. या प्रकरणाचा तात्काळ तपास झाला पाहिजे. अशी मागणीही मुश्रीफ यांनी केली. शंभर कोटीचा लेटर बॉम्ब टाकल्यावर मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो, पण एक हजार कोटीची पत्र देऊन एक अधिकारी अजूनही सेवेत आहे. अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई होण्याची आवश्यकता आहे. असेही मुश्रीफ म्हणाले.

'कारखानदारांचा चारशे रुपये तोटा' -

३१०० रुपये साखरेचा दर हा ३५०० रुपये करावा अशी मागणी राज्य सरकारने यापूर्वीच केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांचा चारशे रुपये तोटा आहे. सातत्याने मागणी करूनही त्याच्यावर केंद्र सरकार विचार करत नाही. केंद्र सरकारने गेल्या वर्षी हेक्‍टरी टनाला हजार रुपये अनुदान दिले होते. यावर्षी ते सहाशे रुपये केले. आता प्रति क्विंटल चारशे रुपये अनुदान दिले आहे. पियुष गोयल जोपर्यंत या विभागाचे मंत्री आहेत तोपर्यंत आमच्या शेतकऱ्याचे कल्याण होणार नाही. साखरेचे दर वाढवायला ते तयार नाहीत. अनुदानात घट करत आहेत. त्यामुळे तात्काळ अनुदान वाढवले पाहिजे अशी मागणीही मुश्रीफ यांनी केले.

हेही वाचा - बार्ज पी-३०५ दुर्घटनेतील मृतदेह ताब्यात घेण्यास अडचणी; पोलिसांच्या अनुपस्थितीने नातेवाईकांचा संताप

'दहा वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही' -

पुढे मुश्रीफ म्हणाले, माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पुढची साडेतीन वर्षे नाही तर दहा वर्षात देखील महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी मी पुन्हा येईनची स्वप्ने पाहू नयेत. असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. फडणवीस यांची सध्या गुजरात गोवा आणि उत्तर प्रदेशात गरज असल्याने तेथील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी. असा खोचक टोला देखील मुश्रीफ यांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.