ETV Bharat / state

राज्य सरकार महिला बचत गटाची बँक स्थापन करणार - हसन मुश्रीफ - हसन मुश्रीफ न्यूज

बचतगट चळवळीच्या माध्यमातून अनेक कुटुंबे स्वतःच्या पायावर उभी राहतील, यासाठी काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरच महिला बचत गटांची स्वतंत्र बँकही स्थापन करणार असल्याचे ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ
author img

By

Published : Oct 3, 2020, 2:12 PM IST

कोल्हापूर - महिलांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच महिला बचत गटाची स्वतंत्र बँक स्थापन करणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ते ग्रामविकास विभागांतर्गत उमेद संस्थेच्यावतीने आयोजित ऑनलाइन महिला मेळाव्यात बोलत होते.

राज्यातील महिला बचत गट हे केवळ सरकारी काम किंवा अभियान म्हणून राहणार नाही. महिलांच्या सर्वांगीण उन्नतीचे हे काम लोकचळवळ म्हणून उभारू, असेही त्यांनी म्हटले. मुश्रीफ म्हणाले, महात्मा गांधींनी मांडलेले ग्रामविकासाचे विचार सर्वांनाच अनुकरणीय आहेत. जोपर्यंत गावे स्वच्छ, समृद्ध आणि स्वावलंबी होत नाहीत, तोपर्यंत विकास ही संकल्पनाच अपुरी असणार आहे. गावांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर, आधी महिलांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास झालाच पाहिजे.

राज्य सरकार महिला बचत गटाची बँक स्थापन करणार

हेही वाचा-सिंगापूरची 'ही' कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये करणार ५,५१२ कोटींची गुंतवणूक

चळवळीच्या आढाव्यासाठी अभ्यासगटाची स्थापना

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून उमेद नवनवीन योजना आणत आहे. आपण सर्वांनीच या सगळ्याचा अंतर्मुख होऊन आढावा घेण्याची खरी गरज आहे. या चळवळीच्या माध्यमातून आपण काय मिळवले, किती कुटुंबांना स्थैर्य मिळाले, अभ्यास करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा-कर्जफेडीच्या मुदतवाढीतील चक्रवाढ व्याज माफ करू; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

मायक्रो फायनान्ससारख्या दुष्टचक्रात महिला-

ते म्हणाले, महिला बचत गटांच्या माध्यमातून दरवर्षी सरासरी 7 हजार 700 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करीत आहे. या चळवळीच्या माध्यमातून पन्नास लाखांहून अधिक कुटुंबे जोडली गेली आहेत. असे असले तरी, मायक्रो फायनान्ससारख्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे महिला रस्त्यावर येऊन मोर्चे काढत आहेत, याचा खेद वाटतो. या माता-भगिनींची मायक्रो फायनान्सच्या चक्रव्यूहातून सुटका करण्यासाठी अभ्यासगटसुद्धा नियुक्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चळवळीच्या माध्यमातून अनेक कुटुंबे स्वतःच्या पायावर उभा राहतील, यासाठी काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरच महिला बचत गटांची स्वतंत्र बँकही स्थापन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या ऑनलाईन मेळाव्याला राज्यभरातील दीड लाखांहून अधिक महिलांनी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.