ETV Bharat / state

जेवण बनवलं आम्ही, हे फक्त वाढपी; ओबीसी आरक्षणाच्या श्रेयावरून मुश्रीफ यांची भाजपवर टीका

author img

By

Published : Jul 22, 2022, 11:21 AM IST

हसन मुश्रीफ ( MLA Hasan Mushrif ) हे 2024 मध्ये लोकसभा लढवणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी लोकसभा लढवणार ( Lok Sabha Elections ) नाही. मी पुन्हा एकदा विधानसभेसाठी इच्छुक आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेला निर्णय म्हणजे सर्वच ओबीसी समाजाचा विजय आहे. असही त्यांनी मत व्यक्त केले.

MLA Hasan Mushrif
आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेला निर्णय म्हणजे सर्वच ओबीसी समाजाचा विजय आहे. महाविकास आघाडीने ओबीसी अरक्षणाशिवाय ( OBC Reservation ) कोणतीही निवडणूक घ्यायची नाही अशी भूमिका घेतली होती. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र शिंदे गटाने बंड केले आणि आमचे सरकार कोसळले. त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांना आमच्या काळातील आयोगाचा अहवाल प्राप्त झाला. तो त्यांनी कोर्टात सादर केला. त्यामुळे आम्ही सगळं जेवण बनवले आणि हे फक्त वाडपी असल्याची टीका मुश्रीफ यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर केली.

मी लोकसभा लढवणार नाही; पुन्हा विधानसभा- दरम्यान, हसन मुश्रीफ हे 2024 मध्ये लोकसभा ( Lok Sabha Elections 2024 ) लढवणार अशी चर्चा करत सुरू आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी लोकसभा लढवणार नाही. मी पुन्हा एकदा विधानसभेसाठी इच्छुक आहे. याला अजून बराच वेळ आहे. तोपर्यंत संजय मंडलिक यांचे ठाकरे यांच्यावर प्रेम आले आणि ते पुन्हा परत आले तर त्यांना उमेदवारी मिळेल. त्यामुळे बघू पुढे काय होते. त्याला अजून दोन वर्षे आहेत. असेही मुश्रीफ म्हणाले. त्यांनी यावेळी अधिवेशनात तरतूद केलेल्या कामांचा निधी रोखणे चुकीचे असल्याचेही म्हंटले. अलीकडे मंजुरी मिळालेल्या कामांना स्थगिती देणं समजू शकतो पण दोन वर्षांपूर्वीच्या कामांना स्थगिती का? असा सवाल सुद्धा मुश्रीफांनी उपस्थित केला.

ओबीसी आरक्षणाच्या श्रेयावरून मुश्रीफ यांची भाजपवर टीका

यापूर्वी बाळासाहेब थोरातांनीही दिली होती प्रतिक्रिया - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल हा ( Supreme Court OBC Judgment ) ओबीसी समाजासह आम्हा सर्वांसाठी आनंद देणारा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. ओबीसी आरक्षणा बाबत प्रक्रिया क्रिया देताना आमदार थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने बांठिया समितीची स्थापना केली होती. या समाजाला आरक्षण मिळावे याकरता सरकारने सातत्याने पाठपुरावा केला. सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल मंजूर केला असून 27 टक्के आरक्षण मिळाले आहे. हे ओबीसी समाज व आम्हा सर्वांसाठी आनंदाचे आहे. या आरक्षणाप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात. कारण कोणतीही निवडणुकी वेळेत व्हावी ते लोकशाहीसाठी पोषक असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

हेहा वाचा : OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या श्रेयवादासाठी ...https://www.etvbharat.com › kolhapur

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.