ETV Bharat / state

कोल्हापूरच्या भवानी मंडपाला बांधले २१ किलो साखरेचे तोरण, काय आहे तोरणामागची परंपरा जाणून घ्या - festival

कोल्हापुरातील माळकर कुटुंबीयाने रिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचे तोरण बांधले. माळकर कुटूंबियांतर्फे गेल्या चार पिढ्यापासून भवानी मंडपाला तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते तोरण भवानी मंडपाला बांधण्यात आले.

भवानी दरवाजाला बांधलेले तोरण
author img

By

Published : Apr 6, 2019, 2:14 PM IST

कोल्हापूर - गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात महाराष्ट्रभर हा सण उत्साहात साजरा केला जातो. कोल्हापुरात याचे विशेष महत्व आहे. येथील ऐतिहासिक भवानी मंडपाला २१ किलोंच्या साखरेच्या माळेचे तोरण बांधण्यात आले. राजाराम महाराजांना मुलगी झाली म्हणून माळकर कुटुंबीयांनी हे तोरण बांधले होते. ही पंरपरा गेल्या चार पिढ्यांपासून अखंड सुरू आहे.

राजन क्षीरसागर यांच्या हस्ते तोरण बांधण्यात आले

मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला दिवस. गुढीपाडव्याचा सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होतो. दारोदारी उभारण्यात आलेल्या गुढ्या, रांगोळीची आकर्षक सजावट आणि परिचितांना दिल्या जाणाऱ्या नवनवर्षाच्या शुभेच्छांची दिवसभर रेलचेल असते. शहरासह जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने सण साजरा करण्यात येतो. कोल्हापुरातील माळकर कुटुंबीयाने रिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचे तोरण बांधले. माळकर कुटूंबियांतर्फे गेल्या चार पिढ्यापासून भवानी मंडपाला तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते तोरण भवानी मंडपाला बांधण्यात आले.

मुलीच्या जन्माच्या स्वागताची परंपरा
कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झाले होते. तेव्हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनविली. २५ फुटांची असणारी साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. ही परंपरा आजतागायत अखंड सुरू आहे. यंदाही शिवसेनेचे आमदार राजेश शिरसागर यांच्या हस्ते आणि नगरसेवक ईश्वर परमार , निखिल माळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ किलोची आणि २१ फुटांची माळ भवानी मंडपाला बांधण्यात आली.

Intro:अँकर - मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला दिवस, गुढीपाडव्याचा सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. दारोदारी उभारण्यात आलेल्या गुढ्या, रांगोळीची आकर्षक सजावट आणि परिचितांना दिल्या जाणाऱ्या नवनवर्षाच्या शुभेच्छांची दिवसभर रेलचेल होती. शहरासह जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने सण साजरा करण्यात आला. येथील माळकर कुटुंबीयानं रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधले. माळकर कुटूंबियांतर्फे गेल्या चार पिढीपासून भवानी मंडपाला तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते तोरण भवानी मंडपाला बांधण्यात आले.Body:आज सकाळी अकरा वाजता भवानी मंडपाला साखरेची माळ बांधण्यात आली. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं, तेव्हा आनंदोत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनविली. २५ फुटांची असणारी ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. ही परंपरा आजतागायत अखंड सुरू आहे. यंदाही शिवसेनेचे आमदार राजेश शिरसागर यांच्या हस्ते आणि नगरसेवक ईश्वर परमार , निखिल माळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ किलोची आणि २१ फुटांची माळ भवानी मंडपाला बांधण्यात आली.

बाईट- राजेश क्षीरसागर (आमदार, शिवसेना)Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.