ETV Bharat / state

सार्वजनिक गणेश तरुण मंडळांनी प्लाझ्मा दान उपक्रम राबवावे - पालकमंत्री सतेज पाटील - कोल्हापूर गणेशोत्सव न्यूज

यंदाच्या वर्षी गणेश उत्सवात गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.

सतेज पाटील ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी
सतेज पाटील ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी
author img

By

Published : Aug 15, 2020, 4:39 PM IST

कोल्हापूर - सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो, ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. ‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ हे सार्थ ठरवण्यासाठी नियमांचे पालन करा, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा करण्यात आला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा आज देशभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करुन साजरा होत आहे. ज्यांच्या असिम त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.’

कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासन-प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहेच, मात्र आम्ही कोल्हापूरी- जगात भारी ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे, असेे पाटील म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळपास गेली पाच महिने लॉकडाऊनसह अन्य प्रतिबंधक उपायांव्दारे कोरोनाला हरविण्याचे प्रयत्न शासन आणि प्रशासन यांच्याकडून युध्दपातळीवर केले जात आहेत. असे असले तरी गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात 12 हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुध्दच्या युध्दात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येकाने नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाला हरविण्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेेही पाटील म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासनाची वाटचाल सुरू आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 43 हजार 965 शेतकऱ्यांच्या खात्यावर 262 कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास शासन वचनबध्द आहे.

आपल्या सर्वांना आनंद देणारा गणेशोत्सव पुढील आठवड्यात साजरा होणार आहे. आपण सर्वांनी उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा. पण सोशल डिस्टसिंग तसेच स्वत:च्या आणि कुटूंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात प्लाझ्मा दान सारखे उपक्रम राबवून कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यासाठी सहकार्य करावे. मोहरमच्या उत्सवात सुध्दा सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी महापौर निलोफर आजगेकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

कोरोना योध्यांना मानाचा मुजरा -
जिल्ह्यात सुरु असलेल्या कोरोना विरुध्दच्या लढ्यात शासन, प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था-संघटना तसेच जिल्ह्यातील जनतेने केलेले सहकार्य महत्वाचे आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस व सर्व स्टाफ, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागाचे शासकीय कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे सदस्य या सर्व कोरोना योध्दांना आजच्या स्वातंत्र्यदिनी मी मानाचा मुजरा करतो, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी गौरव केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.