ETV Bharat / state

'गाव मोठ्ठा विकास छोटा'; कोल्हापूरच्या वाघवे गावची व्यथा

author img

By

Published : Sep 20, 2019, 2:07 PM IST

Updated : Sep 21, 2019, 4:48 PM IST

केंद्राच्या धर्तीवर राज्यात सुरू केलेल्या आमदार आदर्श गाव योजनेत राज्यातील आमदारांनी मोठ्या उत्साहाने गावे दत्तक घेतली खरी, पण या गावांच्या अवस्थेत कोणताही मुलभूत बदल झालेला दिसत नाही.. कोल्हापूरच्या वाघवे गावची तऱ्हा ही अशीच आहे...

वाघवे गाव कोल्हापूर

कोल्हापूर - पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेले वाघवे हे जवळपास 6 हजार लोकवस्तीचे गाव. गेल्या अनेक वर्षांपासून गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे. विधानसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये खरंतर वाघवे गाव निर्णायक ठरले आहे., कारण ज्या उमेदवाराला गावातुन जास्त मतदान तो उमेदवार विजयी झाल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. यामुळे या भागाचे आमदार सत्यजित पाटील यांनी हे गाव दत्तक घेतले होते.

आमदारांनी दत्तक घेतल्यानंतरही कोल्हापूरच्या वाघवे गावची परिस्थीती विशेष न बदलल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत

हेही वाचा... दत्तक घेतलेल्या 'धसवाडी' गावात 5 वर्षात एकदाही गेल्या नाहीत मंत्री पंकजा मुंडे... पाहा परिस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात राबवलेल्या आदर्श ग्राम योजनेची पुनरुक्ती करत राज्यातही आमदार आदर्श गाव योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघातील आमदारांनी काही गावे विकासकामांसाठी दत्तक घेतली. शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी सुद्धा वाघवे हे गाव दत्तक घेतले. आमदारांनी गाव दत्तक घेतल्यानंतर गावकऱ्यांना, आता गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल असे वाटले होते. तसेच तालुक्यातील लोकं आपल्या गावाकडे आदर्श गाव म्हणून पाहतील असेही अनेकांना वाटले होते., मात्र गाव दत्तक घेऊन गाव आदर्श तर नाही मात्र कोणताही मुलभूत बदल झाला नसल्याची खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. एकवेळा शिवसेनेचे सत्यजित पाटील आणि एकवेळा जनसुराज्य शक्तीचे विजय कोरे हे आमदार होते, असे असूनही दोघांच्याही कार्यकाळात गावाचा म्हणवा तसा विकास झाला नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.

हेही वाचा... 'शेवटच्या श्वासापर्यंत खेड्या-पाड्यातील लोकांची साथ देईन'

अनेक वर्षांपासून गावातील मुख्य रस्त्याची दुरवस्था

गावातील काही गल्लीमध्ये रस्त्याची कामे झाली आहेत पण गेल्या अनेक वर्षांपासून गावातील मुख्य रस्ताची अवस्था एखाद्या पानंदमधल्या रस्त्यापेक्षाही बिकट झाली आहे. गावातील मुख्य रस्त्याच्या दुरूस्तीची आता ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. काही गटाराची अवस्था सुद्धा दयनीय असून मुस्लीम वसाहतीमध्ये आजपर्यंत रस्तेच बनवले नाहीत, अशी तक्रार होत आहे.

गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज मात्र जागेअभावी रखडले काम

गावाची जवळपास 6 हजार इतकी लोकसंख्या आहे. गावात गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होत आहे. पण गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असूनही ते जागे अभावी अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे गावातील लोकांना किरकोळ उपचारासाठी सुद्धा खाजगी दवाखाने किंव्हा 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोतोली येथील आरोग्य केंद्राकडे हेलपाटे मारावे लागतात.

हेही वाचा... कर्जत-जामखेड, पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता...

गावापासून वाड्या वेगळ्या करून त्यांची वेगळी ग्रामपंचायत करण्याची मागणी

वाघवे गावाला सद्या 8 वाड्या आणि गुडे हे नववे गाव जोडले गेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणारा निधी नेमका कुठे आणि कसा वापरायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीला इतर वाड्यांकडे सुद्धा लक्ष द्यावे लागत असते. प्रत्येक गावाला मोठया प्रमाणात निधी देणे आमदारांना सुद्धा शक्य होत नाही. मतदारसंघातील इतर गावांना सुद्धा त्यांना निधी द्यावा लागत असतो. त्यामुळे वाघवे गावापासून इतर वाड्या वेगळ्या करा, अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. गावापासून वाड्या वेगळ्या केल्यानंतरच ग्रामपंचायतीला मिळणारा निधी गावातल्या विकासकामांसाठी वापरता येऊ शकतो, असे येथील गावकरी बोलतात.

हेही वाचा... जामनेर विधानसभा मतदारसंघ : भाजपचे 'संकटमोचक' मात्र विरोधकांसाठी संकट ?​​​​​​​

70 लाख खर्च करूनही 2007 पासून गावातील भारत निर्माण योजना अपूर्णच

गावात भारत निर्माण योजना मंजूर झाली. 2007 साली सुरू झालेल्या या योजनेचे काम अद्यापही अपूर्ण आहे. भारत निर्माण योजनेतून 2009 साली पाण्याची टाकी बांधण्यात आली असून टाकीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सद्या 1983 साली बांधलेल्या जुन्या टाकीमध्येच पाणी सोडले जात आहे. ही पाण्याची टाकी सुद्धा आता जीर्णावस्थेत आहे. केव्हाही ही टाकी ढासळले अशी याची अवस्था आहे. असे झाल्यास पर्यायी व्यवस्था आता गावाकडे नाहीये. यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने सुद्धा केली आहेत. त्यामुळे अपूर्ण असलेली भारत निर्माण योजनेद्वारे उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे काम तात्काळ पूर्ण व्हावे याची प्रमुख मागणी आहे.

कोल्हापूरच्या वाघवे सारखी इतर अनेक गावे सध्या विकासाची आस घेऊन बसलेला आहेत, मात्र आमदारांनी स्वतः दत्तक घेऊनही गावाचा विकास होत नसेल, तर तक्रार करायची कोणाकडे हा प्रश्न गावकऱ्यांपुढे आहे.

Intro:पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेले वाघवे हे जवळपास 6 हजार लोकवस्तीचे गाव. 12 वाड्या आणि तेरावं गाव अशी या गावाची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे. यामध्ये गुडे गावाचा सुद्धा समावेश आहे. विधानसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये खरंतर वाघवे गाव निर्णायक ठरलं आहे. ज्या उमेदवाराला गावातुन जास्त मतदान तो उमेदवार विजयी झाल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. मागील दोन निवडणुकांचा विचार केला तर एकवेळा शिवसेनेचे सत्यजित पाटील आणि एकवेळा जनसुराज्य शक्तीचे विजय कोरे हे आमदार होते. या दोघांच्याही कार्यकाळात गावात म्हणवातसा विकास झाला नसल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात केलेल्या आदर्श ग्राम योजनेच्या घोषणेची पुनरुक्ती करीत राज्यातही आमदार आदर्श गाव योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघातील आमदारांनी काही गावं विकासकामांसाठी दत्तक घेतली. शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी सुद्धा वाघवे हे गाव दत्तक घेतले. आमदारांनी गाव दत्तक घेतल्यानंतर गावकऱ्यांना आता गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल असे वाटले होते. शिवाय तालुक्यातील लोकं गावाकडे आदर्श गाव म्हणून पाहतील असेही अनेकांना वाटले होते. पण गाव दत्तक घेऊन सुद्धा गाव आदर्श झालं नसल्याची खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. Body:*अनेक वर्षांपासून गावातील मुख्य रस्त्याची दुरवस्था*

गावातील काही गल्लीमध्ये रस्त्याची कामं झाली आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून गावातील मुख्य रस्ताची अवस्था एखाद्या पानंदमधल्या रस्त्यापेक्षाही बिकट झाली आहे. गावातील मुख्य रस्त्याची आता ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. काही गटाराची अवस्था सुद्धा दयनीय असून मुस्लीम वसाहतीमध्ये आजपर्यंत रस्तेच बनवले नाहीयेत.

*गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज, जागेअभावी रखडले काम*

गावाची जवळपास 6 हजार इतकी लोकसंख्या आहे. गावात गेल्या अनेकवर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होत आहे. पण गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असून ते सुद्धा जागे अभावी अद्याप पूर्ण होऊ शकले नाहीये. त्यामुळे गावातील लोकांना किरकोळ उपचारासाठी सुद्धा खाजगी दवाखाने किंव्हा 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोतोली येथील आरोग्य केंद्राकडे हेलपाटे मारावे लागतात.

*गावापासून वाड्या वेगळ्या करून त्यांची वेगळी ग्रामपंचायत करावी*

वाघवे गावाला सद्या 8 वाड्या आणि गुडे हे नववे गाव जोडले गेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणारा निधी नेमका कुठे कुठे वापरायचा हा सर्वात मोठा आणि पहिला प्रश्न असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीला इतर वाड्यांकडे सुद्धा लक्ष द्यावे लागत असते. प्रत्येक गावाला मोठया प्रमाणात निधी देणे आमदारांना सुद्धा शक्य होत नाही. मतदारसंघातील इतर गावांना सुद्धा त्यांना निधी द्यावा लागत असतो. त्यामुळे वाघवे गावापासून इतर वाड्या वेगळ्या करा अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. गावापासून वाड्या वेगळ्या केल्यानंतरच ग्रामपंचायतीला मिळणारा निधी गावातल्या विकासकामांसाठी वापरता येऊ शकतो. त्यामुळे गावाचा विकास साधता येणार असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

*जवळपास 70 लाख खर्च करूनही 2007 पासून गावातील भारत निर्माण योजना अपूर्णच*

गावात भारत निर्माण योजना मंजूर झाली. 2007 साली सुरू झालेल्या या योजनेचे काम अद्यापही अपूर्ण आहे. भारत निर्माण योजनेतून 2009 साली पाण्याची टाकी बांधण्यात आली असून टाकीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सद्या 1983 साली बांधलेल्या जुन्या टाकीमध्येच पाणी सोडले जात आहे. ही पाण्याची टाकी सुद्धा आता जीर्णावस्थेत आहे. केंव्हाही ही टाकी ढासळले अशी याची अवस्था आहे. असे झाल्यास पर्यायी व्यवस्था आता गावाकडे नाहीये. यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने सुद्धा केली आहेत. त्यामुळे अपूर्ण असलेली भारत निर्माण योजनेद्वारे उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे काम तात्काळ पूर्ण व्हावे याची प्रमुख मागणी आहे.

(आमदारांच्या दत्तक गावांच्या एपिसोड साठी वापरा)
(कृपया चौपाल संपूर्ण लावा, ज्यांना सांगून थांबायला सांगितले होते ते सर्व नाराज होतात )Conclusion:
Last Updated : Sep 21, 2019, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.