ETV Bharat / state

गोकुळचा नवीन अध्यक्ष 14 मे ला ठरणार, कोणाच्या गळ्यात पडणार माळ? - Gokul milk election

येत्या 14 मे रोजी अध्यक्ष निवड होणार असून विश्वास उर्फ आबाजी पाटील किंव्हा अरुण डोंगळे यांच्याच नावाची चर्चा आहे. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नूतन संचालकांना याबाबतच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

गोकुळचा नवीन अध्यक्ष 14 मे ला ठरणार
गोकुळचा नवीन अध्यक्ष 14 मे ला ठरणार
author img

By

Published : May 8, 2021, 12:31 PM IST

कोल्हापूर - नुकतीच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक पार पडली. यामध्ये सत्ताधारी गटाला धूळ चारत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने बाजी मारली. मात्र आता सर्वांचे लक्ष गोकुळचा नवा अध्यक्ष कोण होणार याकडे लागून राहिले आहे.

येत्या 14 मे रोजी अध्यक्ष निवड होणार असून विश्वास उर्फ आबाजी पाटील किंव्हा अरुण डोंगळे यांच्याच नावाची चर्चा आहे. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नूतन संचालकांना याबाबतच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. अध्यक्ष निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून वैभव नावडकर काम पाहणार आहेत.

नवीन आव्हान; अनुभवींना अध्यक्षपदाची धुरा -

गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळमध्ये महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, अरुण नरके गटाची सत्ता आहे. मात्र अनेक मुद्यांवरून पालकमंत्री सतेज पाटील यांनी लढा दिला होता. शिवाय दूध उत्पादकाला जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल याबाबत सुद्धा ते वारंवार बोलत होते. त्यामुळे उत्पादकांनी त्यांना संधी दिली असून त्यांच्यासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दूध उत्पादकांना दोन रुपये जादा कसे देता येईल याबाबत आत्तापासूनच चर्चा करत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी अध्यक्ष पदाची धुरा अनुभवी व्यक्तीवरच सोपविण्यात येणार असून गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या नावाची चर्चा आहे. दोघांनीही सत्ताधारी गटाला रामराम ठोकून सतेज पाटील यांच्या गटाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या पाठिंब्यानेच विरोधी गटाचा विजय सुकर बनला होता. त्यामुळे दोघांपैकी एकाचे नाव जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे यावेळी उपाध्यक्ष पद सुद्धा असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे 14 तारखेला होणाऱ्या गोकुळच्या अध्यक्ष निवडीकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडून आलेले नूतन संचालक पुढीलप्रमाणे -

विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी 17 विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :

1) अरुण गणपतराव डोंगळे (राधानगरी)
2) अभिजीत प्रभाकर तायशेटे (राधानगरी)
3) अजित शशिकांत नरके (पन्हाळा)
4) नवीद हसन मुश्रीफ (कागल)
5) शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (करवीर)
6) आबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (करवीर)
7) किसन बापुसो चौगले (राधानगरी)
8) रणजितसिंह कृष्णराव पाटील (भुदरगड)
9) नंदकुमार सखाराम ढेंगे (भुदरगड)
10) कर्णसिंह संजयसिंह गायकवाड (शाहूवाडी)
11) बाबासाहेब श्रीपती चौगुले (करवीर)
12) प्रकाश रामचंद्र पाटील (करवीर)
13) संभाजी रंगराव पाटील (करवीर)
14) अमरसिंह यशवंत पाटील (पन्हाळा)
15) डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर (हातकणंगले)
16) बयाजी देवू शेळके (गगनबावडा)
17) अंजना केदारी रेडेकर (आजरा)

सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (महाडिक, पी. एन. पाटील, नरके गट) :

1) अंबरीशसिंह संजय घाटगे (कागल)
2) बाळासो उर्फ वसंत नानु खाडे (करवीर)
3) चेतन अरूण नरके (पन्हाळा)
4) शौमिका अमल महाडिक (हातकणंगले)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.