ETV Bharat / state

Ghatge Patil Industry : संरक्षण मंत्रालयाकडून घाटगे पाटील इंडस्ट्रीजचा गौरव; पाहा सविस्तर - Industry

कोल्हापूरातील घाटगे पाटील इंडस्ट्रीजला भारत सरकारचा रक्षा मंत्री एक्सलन्स पुरस्कार ज्याचे 'सृजन रत्न पुरस्कार' असे नाव( Ghatge Patil Industry Honored Srijan Ratna Award  ) आहे. त्याने गौरविण्यात करण्यात आले आहे. नुकत्याच गुजरात येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.

Ghatge Patil Industry
इंडस्ट्रीजचा गौरव
author img

By

Published : Oct 26, 2022, 5:42 PM IST

Updated : Oct 27, 2022, 3:37 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरातील घाटगे पाटील इंडस्ट्रीजला भारत सरकारचा रक्षा मंत्री एक्सलन्स पुरस्कार ज्याचे 'सृजन रत्न पुरस्कार' असे नाव( Ghatge Patil Industry Honored Srijan Ratna Award ) आहे. त्याने गौरविण्यात करण्यात आले आहे. नुकत्याच गुजरात येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. स्वतः देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ( Defence Ministry Rajnath Singh ) आणि तिन्ही दलाचे प्रमुख अनिल चौहान यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये देशभरातील 218 कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. कशासाठी हा पुरस्कार देण्यात आला पाहा आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक किरण पाटील यांच्याशी साधलेला संवाद..

घाटगे पाटील इंडस्ट्रीजचा गौरव

घाटगे पाटील इंडस्ट्रीजचा गौरव झाला : कोल्हापूरातील घाटगे पाटील इंडस्ट्रीजची देशभरात एक वेगळी ओळख आहे. कारण देशातील सर्वात मोठ्या फौंड्री मध्ये सुद्धा या कंपनीचे नाव घेतले जाते. याच कंपनीने भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेत 'मोठे उद्योग' श्रेणीमधून प्रथम क्रमांक पटकावला ( Defence Ministry Honored Ghatge Patil Industry ) आहे. भारतीय लष्करमध्ये तैनात असलेल्या टेट्रा ट्रक साठी वापरले जाणारे स्टीयरिंग गीअर असेंब्ली आणि विंच असेंब्ली अशी दोन उत्पादने या कंपनीने बनवली होती. विंच असेंब्ली, ज्याचा उपयोग ट्रकवरील जड मशीन किंवा अगदी टाक्या खेचण्यासाठी केला जातो. दुसरे म्हणजे ट्रकसाठी स्टीयरिंग गीअर असेंब्ली, जे ट्रक्सना अवघड वाटेवर आणि युद्धक्षेत्रातील भूप्रदेशात चालविण्यास मदत करतात. कंपनीतील एकूण 40 अभियंत्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारले आणि अवघ्या सात महिन्यांत हे काम पूर्ण केले आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातील अनेक नामवंत कंपन्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता मात्र कोल्हापुरातील घाटगे पाटील इंडस्ट्रीज ला प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना सृजन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Ghatge Patil Industries
सृजन रत्न पुरस्कार

देशातच टॅलेंट : यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक किरण पाटील म्हणाले, "संरक्षण दलांना आवश्यक असलेल्या अभियांत्रिकी उत्पादनांमध्ये आमचे प्रयत्न करून भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही आमचा वाटा उचलत आहोत. आधी बाहेरच्या प्रगत देशांवर आपल्याला अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता असे नाही आपला देश उत्पादनाच्या क्षेत्रात नेहमी सक्षम होता फक्त त्याला बळ मिळत नव्हते. आता मेक इन इंडिया च्या माध्यमातून पाठबळ मिळत आहे. शिवाय आता बाहेरून काही गोष्टी आयात कराव्या लागायच्या त्या इथंच बनत असल्याने अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी म्हंटले.

Srijan Ratna Award

Last Updated : Oct 27, 2022, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.