ETV Bharat / state

सराफा व्यवसायिकाकडून 2 कोटींची फसवणूक

author img

By

Published : Apr 17, 2021, 5:03 PM IST

करवीर तालुक्यातील बालिंगा येथील एक सराफा व्यवसायिक अनेकांना कोट्यावधीचा गंडा घालून पसार झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची फिर्याद करवीर पोलीस ठाण्यात दिली आहे. तर दुसरीकडे फसवणूक झालेल्या ग्राहकांनी देखील या सराफाच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

सराफा व्यवसायिकाकडून 2 कोटींची फसवणूक
सराफा व्यवसायिकाकडून 2 कोटींची फसवणूक

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील बालिंगा येथील एक सराफा व्यवसायिक अनेकांना कोट्यावधीचा गंडा घालून पसार झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची फिर्याद करवीर पोलीस ठाण्यात दिली आहे. तर दुसरीकडे फसवणूक झालेल्या ग्राहकांनी देखील या सराफाच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. जवळपास दोन कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे ग्राहकांनी सांगितले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सतीश उर्फ संदीप सखाराम पोवाळकर (रा.कनेरकर नगर फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) असे या सराफा व्यवसायिकाचे नावा आहे.

करवीर तालुक्यातीलच या सराफा व्यावसायिकाने दहा वर्षांपूर्वी बालिंगा येथे सराफा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याने सुवर्ण ठेव योजना सुरू केली. दुकानातील व्यवसाय वाढत जाताच तो ग्राहकांकडून सोने तारण घेऊ लागला. गावातच सोय झाल्याने ग्रामस्थांनी देखील अडचणीच्या काळात सोने तारण ठेवून कर्ज घेतले. मात्र मार्चपासून संबंधित सराफा व्यापारी आर्थिक अडचणीत असल्याचे कारण सांगून, ग्राहकांकडून तारण घेतलेले सोने परत द्यायला टाळाटाळ करत होता. एप्रिलमध्ये तारण ठेवलेले सोने देतो असे देखील त्याने ग्राहकांना सांगितले होते. दरम्यान काही ग्राहक एप्रिलमध्ये सोने मागण्यास गेले, मात्र तो टाळाटाळ करू लागला. ग्राहकाने त्याच्या मूळ गावी धाव घेतली असता तो बुधवारपासून पत्नीसह गायब असल्याचे लक्षात आले. ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित व्यक्तीविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

सराफा व्यवसायिकाकडून 2 कोटींची फसवणूक

दोन कोटींची फसवणूक

दरम्यान, करवीर तालुक्यातील दोनवडे येथील रहिवासी राजेंद्र विष्णू चिवटे यांनी सराफा व्यावसायिक सतीश उर्फ संदीप सखाराम पोवाळकर (रा.कनेरकर नगर फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) व अमोल पवार (रा. सातार्डे ता. पन्हाळा) यांच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जवळपास दोन कोटी 9 लाख 40 हजार 497 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा - राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा! ऑल कुर्ला कमिटीकडून गरजूंना ऑक्सिजन वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.