कोल्हापुर: आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष राज्यात जातीय दंगली घडवण्याचे काम करत आहे. सध्या एक टिंग्या रोज बोलतोय त्या टिंग्याला काय माहिती की, हऱ्या नाऱ्याचे उद्योग काय होते. या टिंग्याने जर उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद नाही केले तर त्याला जनतेला सामोरे जावे लागेल असा इशाराही खैरे यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना दिला.
म्हणणूच खासदार जलील यांची धडपड: छत्रपती संभाजी नगर मधील मुस्लिम जनता ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, हे लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांची महाविकास आघाडीत येण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र चुकून खासदार झालेल्या इम्तियाज जलील यांना आम्ही कधीही महाविकास आघाडीत घेणार नाही आणि त्यांनी येण्याचा प्रयत्न केला तर, त्याला मी प्रखर विरोध करणार असल्याचे खैरे म्हणाले. तसेच राज्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आणि महापुरुषांचा वारंवार अपमान करणारे राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचे स्वागत करण्याचे कारण काय होते ? शिवप्रेमींच्या भावना दुखवायचे काम भाजप करत आहे, असा हल्लाबोल ही खैरे यांनी भाजपवर केला.
जाणीवपूर्वक दंगली घडवत आहेत: राज्यातील अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये रविवारी दंगल झाली होती. दोन वेगवेगळ्या गटांमध्ये वाद झाला व नंतर याचे रुपांतर दंगलीत झाले होते. दंगलींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रियाही दिली होती. जे जाणीवपूर्वक दंगली घडवत आहेत त्यांना आम्ही चांगली अद्दल घडवू, असे फडणवीस म्हणाले होते. या दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली होती. तसेच मालमत्तेचेही बरेच नुकसान झाले होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले होते.
अकोल्यामध्ये दोन गटांत हाणामारी : अकोला शहरात काल सोशल मीडियावरील एका पोस्टवरून दोन गटांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर हे दोन गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात प्रचंड दगडफेक झाली होती. या घटनेमध्ये दहा जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -