कोल्हापूर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शिरोळ तालुक्यातील Flag hoisted in krishna river काही जलतरण मंडळाच्या सदस्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. शिरोळ तालुक्यातील उदगाव मधील कृष्णामाई जलतरण flag hoisted by Krishnamai Jaltaran Mandal मंडळाच्या सदस्यांनी आज 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त हातात तिरंगा ध्वज घेऊन मिरज Krishnamai Jaltaran Mandal swimming Krishna river येथील हरिपूरमधील कृष्णा-वारणा नदीच्या संगमापासून ते शिरोळ तालुक्यातील उदगाव पर्यंत तब्बल 9 किलोमीटर पोहत पार केले.
हेही वाचा Radhanagari Dam : राधानगरी धरण 100 टक्के भरलं, पहाटे पहिला स्वयंचलित दरवाजे उघडला
9 किलोमीटर हातात तिरंगा घेऊन पोहत प्रवास शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे कृष्णामाई जलतरण मंडळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या नदीमध्ये नित्याने पोहायला येत असतात. मात्र यंदा स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव देशभरात सर्वजण साजरा करत आहेत. त्यामुळे, आगळ्या वेगळ्या पद्धतीने यामध्ये सहभागी व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळे, मंडळातील 20 सदस्यांनी एकत्रितपणे 9 किलोमीटर पुराच्या पाण्यातून पोहत आणि विशेष म्हणजे हातात तिरंगा घेत अनोख्या पद्धतीने या उपक्रमात सहभाग नोंदवला. हे 9 किलोमीटरचे साहसी अंतर त्यांनी केवळ 1 तास 10 मिनिटांमध्ये पार केला. यामध्ये राजू कलगुटगी, प्रा. सुनिल बनहट्टी, जयपाल मगदूम, गणेश पाचंगे, नितीन पाटील,तानाजी जाधव,महेश महाडिक, ऋषभ पाटील,विक्रम घाटगे, संतोष चुडाप्पा, कोळेकर अण्णा, बाळासो चौगुले, तसेच मंडळाचे अनेक सदस्यांनी पुढाकार घेतला. हा उपक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
कृष्णमाई जलतरण मंडळातर्फे अनेक विधायक कामे मंडळातर्फे कृष्णाघाटवरील स्वच्छता, ब्रिटीश कालीन पुलावरील दगडी बांधकामातील अनावश्यक झाडे तोडणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे, तसेच असंख्य मुलामुलींना मोफत पोहण्यास शिकवणे, तसेच हरिपूर ते उदगाव कृष्णाघाट व कृष्णाघाट उदगाव ते मिरज असा जवळपास 20 किलोमीटर अंतराचा साहसी जलप्रवासाच्या स्पर्धा आयोजित करणे, इत्यादी उपक्रम राबवून साहसी शालेय मुला मुलींना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून गौरविणे, अशी अनेक कामे करण्यात आली आहेत.
हेही वाचा Har Ghar Tiranga अभियानासोबत कोल्हापूरातील माणगावमध्ये हर घर संविधान अभियान