ETV Bharat / state

बंदी असतानाही बैलगाडी शर्यत; राधानगरी पोलिसात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल - Bullock cart race ban

राज्यात बैलगाडी शर्यतीला बंदी आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा आयोजन करण्यास बंदी आहे. मात्र ही बंदी झुगारून कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथील शर्यत प्रेमींनी रविवार ही शर्यंत भरवली होती.

Bullock cart race
बैलगाडा शर्यत
author img

By

Published : Sep 27, 2021, 9:48 PM IST

Updated : Sep 27, 2021, 10:23 PM IST

कोल्हापूर - बैलगाडी शर्यतीला परवानगी नसतानाही कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात केळोशी बुद्रुक येथे चिखलगुट्टा बैलगाडी शर्यती पार पडल्या. कोरोनातही हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. या स्पर्धेच्या 15 आयोजकांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परवानगी नसतानाही भरवली बैलगाडी शर्यत

हेही वाचा - पालघर : नागझरी येथे तीन वाहनांचा अपघात; पाच जखमी

  • परवानगी नसतानाही भरवली बैलगाडी शर्यत -

राज्यात बैलगाडी शर्यतीला बंदी आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा आयोजन करण्यास बंदी आहे. मात्र ही बंदी झुगारून कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथील शर्यत प्रेमींनी रविवार 26 सप्टेंबर रोजी माळरानावर परवानगी न घेता चिखल गुट्टा बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास दहा पेक्षा अधिक स्पर्धक या शर्यतीला सहभागी झाले होते. तर पंचक्रोशीतील हजारो शर्यत प्रेमी ही शर्यत पाहण्यास घटनास्थळी दाखल होते.

  • 15 जणांवर गुन्हा दाखल

बैलगाडी शर्यतीला परवानगी नसतानाही ही स्पर्धा झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. याचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होताच पोलीस प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. दरम्यान, या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या राहुल धोंडीराम पिलावरे, संभाजी सदाशिव चौगुले, महिपती सखाराम पाटील, आनंदा ज्ञानू पिलावरे, गंगाराम धोंडीबा पाटील, ज्योतीराम धोंडीबा चौगुले यांच्यासह पंधरा जणांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच कोरोना निर्बंधांचे नियम पायदळी तुडवल्या प्रकरणीही यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हजारो रुपयांच्या बक्षिसाची जाहिरात करून ही स्पर्धा भरविण्यात आली होती. मात्र, याची कानकून पोलिसांना का लागली नाही? असा देखील सवाल आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - VIDEO : आरोग्य विभागाच्या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबरला

Last Updated : Sep 27, 2021, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.