कोल्हापूर: करवीर तालुक्यातील हसवडे ग्रामपंचायतच्या मागे राहणारे संदीप अण्णासाो पाटील वय वर्ष 36 यांची पत्नी मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. संदीप यांचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या डाव्या कालव्याच्या येथे संदीप पाटील याने पत्नी राजश्री संदीप पाटील वय वर्ष 32, मुलगा समित वय वर्ष आठ आणि मुलगी श्रेया पाटील वय वर्षे 14 यांना या कालव्याजवळ घेऊन गेले.
मुलगी पाण्यातून आली बाहेर: कालव्याजवळ घेऊन गेल्यावर त्याने दोन्ही मुलांना व पत्नीला पाण्यात ढकलून दिले. संदीप पाटील तेथून पसार झाला. मात्र यावेळी मुलगी श्रेया ही कशीबशी पाण्यातून बाहेर येत पाण्याच्या कडेला जखमी अवस्थेत मदतीसाठी ओरडताना ग्रामस्थांना दिसली. ग्रामस्थांनी तिला बाहेर काढून तत्काळ कसबा सांगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी मुलीने आई-वडील व भाऊ पाण्यात असल्याची सांगितले. डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. तर घटनेची माहिती पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पाणबुडीच्या साह्याने पत्नी राजश्री पाटील आणि मुलगा समित पाटील यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
पतीचा गळफास घेऊन आत्महत्या: दुसऱ्या बाजूला संशयित आरोपी संदीप पाटील याचा पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान संदीप पाटील हा कर्नाटकातील भोज येथील एका रस्त्यावर आपली दुचाकी पार्क करून शेतात जाऊन गळफास घेतला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान या घटनेची माहिती सदलगा पोलिसांना देण्यात आली. यावेळी चिकोडीचे डीएसपी बसवराज यलीगार यांच्यासह पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सहाय्यक उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत संदीप पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान संदीप पाटील यांच्या पॅन्टच्या खिशात पत्नी व मुलाचे आधार कार्ड सापडले त्यानुसार पोलिसांनी आधार कार्डवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. हा सर्व प्रकार उघड झालानंतर याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. मात्र संदीपने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. तर अधिक तपास कागल पोलीस करत आहेत.
आत्महत्यांचे सत्र सुरुच: कोल्हापूरात गुन्हे सतत घडत आहेत. विष प्राशन करणे, कधी नदीत उडी घेणे, रुग्णालयाच्या इमारतीतून उडी अशा भयानक मार्गाने जीवन संपवण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे कोल्हापूर हादरले आहे. तसेच याआधीही पती फिरायला घेऊन जात नाही, स्मार्ट फोन घेऊन दिला नाही. या कारणाने वैफल्यग्रस्त झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केली होती. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे या गावात ही घटना घडली होती. प्रियांका वैभव लोकरे (वय 19) असे मृत महिलेचे नाव होते.
हेही वाचा: Thane Crime अनैतिक संबंधाच्या संशयातून सख्ख्या भावाची हत्या आरोपी भाऊ गजाआड