ETV Bharat / state

मताचा जोगवा मागणारे हत्ती प्रश्नावर गप्प का?; शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधींना सवाल - चंदगड-आजरा टस्कर हत्ती शेती नुकसान

कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या काही भागांत गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे मानव-हत्ती संघर्ष सुरू आहे. मात्र, लोकप्रतिनिधी याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

Elephant
टस्कर हत्ती
author img

By

Published : Sep 29, 2020, 2:21 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यात टस्कर हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. मात्र, कोणत्याच लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे जनतेकडे मताचा जोगवा मागणारे लोकप्रतिनिधी हत्ती प्रश्नावर गप्प का? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

चंदगड, आजरा तालुक्यात हत्ती आणि गव्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत

आजरा तालुक्याचा पश्चिम भाग वन्यप्राण्यांचे निवासस्थान बनत चालला आहे. हत्ती आणि गवे जणू शेतातील रहिवासीच झाले आहेत. त्यांच्याकडून शेती व शेतीच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेती उत्पादन खर्च जास्त व नुकसान भरपाई कमी, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तींचा पाच महिन्यात बंदोबस्त करण्यात आला. आजरा तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून हत्ती तळ ठोकून आहेत. तरी देखील प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. गव्यांकडून पेरणोली, देवकांडगाव, मडिलगे, सोहाळे चांदेवाडी या गावातील शेतकऱयांना आजपर्यंत नुकसान भरपाईदेखील मिळालेली नाही. त्यामुळे मताचा जोगवा मागणारे हत्ती प्रश्नाबद्दल मूग गिळून गप्प का आहेत? असा प्रश्न शेतकरी व रहिवासी विचारत आहेत.

चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकुळ सुरूच -

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हत्तींनी धुडगुस घातला आहे. भात, नाचणी, ऊस, मानगे यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. वाघोत्रे, पार्ले, कळसगादेनंतर आता सावंतवाडी परिसरात देखील हत्तींनी भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याठिकाणी हत्तीचे एक कुटुंबच वास्तव्याला असून शेतातील भाताचे पीक चिरडून टाकत आहेत. या नुकसानीचे वनविभागाने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.