ETV Bharat / state

...म्हणून शिरोळ तहसिलदारांना शेतकऱ्यांनी दिला साडी-बांगड्याचा आहेर - कोल्हापूर आंदोलन बातमी

थकीत एफआरपीवरील व्याज रक्कमेच्या वसुलीसाठी आरआरसी अंतर्गत नोटीस काढावी या मागणीसाठी तहसील दालनात आंदोलन करत तहसीलदारांना साडी, बांगड्या, टॉवेल, टोपी, हळद, कुंकू, नारळ असा आहेर दिला.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Jun 23, 2021, 5:37 AM IST

Updated : Jun 23, 2021, 5:46 AM IST

कोल्हापूर - थकीत एफआरपीवरील व्याज रक्कमेच्या वसुलीसाठी आरआरसी अंतर्गत नोटीस काढावी या मागणीसाठी तहसील दालनात धरणे धरून बसलेल्या शेतकरी आंदोलकांनी मंगळवारी (दि. 22 जून) आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. शेतकरी लेकीचा सत्कार म्हणून साडी, बांगड्या, टॉवेल, टोपी, हळद, कुंकू, नारळ, असा आहेर शेतकरी महिलांनी तहसीलदारांना दिला. मात्र, तहसीलदार आपर्णा मोरे यांनी शासनाच्या कोविड नियमालीमुळे आहेर स्वीकारण्यास नकार दिला.

आंदोलन स्थळ

आंदोलन अंकुशच्या धरणे आंदोलनाला शेतकऱ्यांचे पाठबळ

शिरोळ तहसीलदार दलन येथे आंदोलन अंकुशने सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी (दि. 22 जून) तहसील दालनात शेकडो शेतकऱ्यांनी ठाण मांडली होती. एवढेच नाही तर आंदोलक शेतकऱ्यांनी तहसिल आवारातच गॅस शेगडी आणून शेतकऱ्यांसाठी जेवनावळ घातली. तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या द्रोण, पत्रावळी घेवून जेवनासाठी बसलेल्या रांगा पाहून नागरीक आवक् झाल्याचे पाहायला मिळाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या अधिन राहून केली जाईल कारवाई

यावेळी आंदोलकांशी बोलताना तहसीलदार आपर्णा मोरे म्हणाल्या, प्रादेशिकसह संचालकानी दिलेल्या नोटीसमध्ये कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. थकीत व्याजाच्या रक्कमेची नोंद नाही. उलट परिगणीतात तफावत येण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. शिरोळ तहसीलला तिसरी नोटीस देण्यास कोणतीच अडचण नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिन राहून कारवाई केली जाईल. यासाठी जबाबदार साखर कार्यालयाने स्पष्ट निर्देश द्यावेत, असेही त्यांनी म्हटले.

आंदोलक धनाजी चुडमुंगे म्हणाले, आम्ही शेतकरी चार दिवस तहसील दालनात आंदोलन करत आहे. साखर आयुक्तांचे स्पष्ट आदेश असून व्याजाची रक्कम नमुद करण्यात आली आहे. शिवाय तहसिलदार कारखानदारांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा - Rajarshi Shahu Maharaj : यंदापासून शाहू महाराजांच्या जयंतीचा नगारा वाजणार राधानगरी धरणावर

Last Updated : Jun 23, 2021, 5:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.