ETV Bharat / state

Farmer Success Story: नोकरी सोडून दोन भावांनी घेतला गोपालन करण्याचा निर्णय; आज कमवतात महिन्याला दोन ते तीन लाख रूपये उत्पन्न

author img

By

Published : Jun 30, 2023, 7:30 AM IST

कोल्हापूरमधील शेतकऱ्याने दुग्धव्यवसायात चांगले यश मिळविले आहे. सध्या चांगला मिळणारा पगार सोडून अनेक युवक आता व्यवसायाकडे वळू लागले आहेत. अनेक युवक आता दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन, पशुपालन व्यवसाय करू लागली आहेत. कोल्हापुरातील हातकनगले तालुक्यातील पट्टनकोडोली येथील सतिश नरके आणि संदिप नरके हे दोन भाऊ नोकरी सोडून गोपालन करत आहेत. आठ वर्षांपूर्वी एका गायीपासून सुरू केलेला दुग्धव्यवसाय आज 19 गायी वर आला आहे. यातून ते महिनाकाठी एक ते दीड लाख रुपये नफा मिळवत आहेत. जे त्यांच्या नोकरीतील पगारीपेक्षा अनेकपटीने जास्त आहे. त्यांच्या या यशाचा स्पेशल रिपोर्ट पाहू या.

Cow Farming Special Story
गो पालन व्यवसाय
नरके बंधूंचा गो पालन व्यवसाय

कोल्हापूर : शेती तोट्यात असल्याचे म्हटले जाते, परंतु कोल्हापुरातील एका शेतकऱ्याने गोपालनात चांगले आर्थिक उत्पन्न घेत यश मिळविले आहे. कोल्हापुरातील पट्टनकोडोली येथील राहणारे महादेव नरके आणि त्यांची 2 मुले गेल्या 8 ते 10 वर्षांपासून गो पालन व्यवसाय करत आहेत. याआधी महादेव नरके यांचे दोनही मुल सतिश नरके आणि संदिप नरके हे दोघे ही एका कंपनीत नोकरीला होते. नोकरी आणि कष्ट या बदल्यात मिळत असलेला मोबदला अतिशय तोकडा होता, म्हणून दोघांनी ही 2015 पासून नोकरी सोडून व्यवसाय करायचा ठरवल. त्यांनी गो पालन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांच्या घरात 1 गीर गाय होती. मात्र, पूर्ण वेळ व्यवसायात उतरल्याने त्यांनी आणखी गायी घेण्याचा निर्णय घेतला.

दिवसभर गाई चरतात, मनाला येईल तेव्हा पाणी पितात आणि जिथे जाऊन बसू वाटेल तेथे बसतात. यामुळे गायींचा व्यायाम देखील होतो. यामुळे दुधाच्या उत्पन्नात देखील वाढ होते. - नरके बंधू

'अशी' केली सुरूवात : सुरुवातीला 2016 साली त्यांनी एक गाय खरेदी केली. नंतर 2 गायींच्या 3 गायी असे करत आज त्यांच्याकडे 19 गायी आहेत. गायीपासून मिळणारे तब्बल 200 लिटर दुध ते वारणा दूध संस्थेला विकतात. यातून दर दहा दिवसाला 60 ते 70 हजार रुपये तर महिनाकाठी दीड लाख रुपये नफा मिळवतात. गायींचे पडलेले शेण गोळा करून त्यांचा खत तयार करून दोन लाख रुपये त्यातून काढतात. तसेच शेणी ही तयार करून ते विकतात.

शेतीसह जोडधंद्यात यश कसे मिळाले? सरासरी ते यातून दोन ते तीन लाखाचे उत्पन्न काढतात. त्यांच्याकडे सध्या 1 देशी गाय, एच एफ, त्रिवेणी, पंजाबी, जर्मनी, 75 टक्के या जातीचे गायी आहेत. वेगवेगळ्या जातींच्या गायीचे दुध ही वेगवेगळ्या फॅट नुसार दर देतात. तर वारणा दूध संघाकडून त्यांना अल्प दरात डॉक्टरांची सेवा मिळते. कितीही गाया असल्या तरी डॉक्टर त्यांना 50 रुपये दर आकारून सर्व गाईंची तपासणी करतात, तसेच महिन्याकाठी 45 पोती पशुखाद्यही दिले जात.

अशी असते दिनचर्या : नरके यांनी मुक्त गोठा पद्धत अवलंबली आहे. यासाठी त्यांनी एका जागेत मोठा गोठा उभा केला आहे. उन्हापासून आणि पावसापासून बचाव व्हावा, यासाठी पत्र्याचा शेड देखील मारला आहे. सकाळी सहा वाजता दोन्ही भाऊ गोठ्यात येतात स्वच्छता करून दुधाचे धार काढतात काळानुसार बदलणे गरजेचे आहे, म्हणून त्यांनी धार काढण्यासाठी देखील मशीन आणली आहे. सकाळी सहा ते नऊ स्वच्छता आणि दूध काढण्याचे काम झाल्यानंतर सर्व गाई या मुक्त असतात. ठीक ठिकाणी पाण्याची सोय केली असून खाद्य टाकण्यासाठी भांडे देखील तयार केले आहे.

वासरूचे संगोपन : सकाळी सहा ते नऊ आणि संध्याकाळी चार ते सात या वेळेतच स्वच्छता करताना गाईंना बांधून ठेवले जाते. नंतर रात्रभर आणि दिवसभर ते मुक्त असतात असेही ते सांगतात. तर गाईंना वैरण म्हणून हत्ती गवत, शालू, वाडा, कडबा आणि गहारची वैरण घातली जात. सध्या नरके बंधू हे दूध व्यवसाय बरोबरच वासरू देखील तयार करत आहेत. गायींपासून होणाऱ्या वासरूचे संगोपन करून त्यांना मोठे केले जात आहे.

हेही वाचा :

  1. Pune Youth Cow Rearing Business : दोन गाईंपासून सुरू केलेला व्यवसाय पोहचला 400 गाईंपर्यंत!, वाचा पुणे जिल्ह्यातील या तरुणाची प्रेरणादायी कहानी
  2. Gir Breed Calf Birth: भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्या गीर जातीच्या कालवडीचा जन्म
  3. Jammu Kashmir Farmer Pune Visit : जम्मू काश्मीरमधील शेतकरी पुणे दौऱ्यावर; जम्मूत दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.