ETV Bharat / state

कोल्हापुरात वीज दरवाढी विरोधात शेतकरी रस्त्यावर; महसूल मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा इशारा - महावितरण कंपनी

वीजनिर्मिती खर्च, प्रशासकीय खर्च आणि वीज गळती यावर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे एका युनिटमागे १ रुपये ९० पैसे खर्च वाढत आहे. त्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

वीजदरवाढीविरोधात रस्त्यावर उतरलेले शेतकरी
author img

By

Published : Jul 1, 2019, 5:35 PM IST

कोल्हापूर - महावितरण कंपनीने कृषी-औद्योगिक, घरगुती, वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्याविरोधात ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. तसेच फसवणूक करणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्या अडवून जाब विचारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

वीजदरवाढीविरोधात रस्त्यावर उतरलेले शेतकरी

भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी वीज दरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यापासून राज्यातील कृषीपंपधारक, घरगुती, औद्योगिक ग्राहकांची बेसुमारपणे आर्थिक लूट या सरकारच्या काळात सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच वीजनिर्मिती खर्च, प्रशासकीय खर्च आणि वीज गळती यावर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे एका युनिटमागे १ रुपये ९० पैसे खर्च वाढत आहे. देशात सर्वात जास्त महाग वीजपुरवठा करणाऱ्या राज्यात महाराष्ट्र पहिल्या तीन राज्यामध्ये आहे. यापूर्वी मोर्चा काढून यासंदर्भात सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वीज दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्यांनी हे आश्वासन पाळले नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. त्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढला. कोल्हापूरच्या दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकऱयांनी वीज दरवाढ विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या मोर्चादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

२०१४ पूर्वी वाढीव वीज बिलांची होळी करणारे, सत्तेवर असल्यास वीजदर स्थिर ठेवण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महावितरणच्या लुटीच्या या धंद्याला साथ दिली आहे. याचा परिणाम शेती, उद्योग, व्यवसाय यांच्या विकास आणि उलाढालीवर तसेच सामान्य कुटुंबीयांच्या आर्थिक बजेटवर होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला.

वीजवाढीसंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्या -

  1. राज्यातील सर्व ४१ लाख शेतीपंपधारक वीज ग्राहकांचे वीज बिले तपासून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी.
  2. अचूक वीज बिलांच्या आधारे नवीन कृषीसंजीवनी योजना राबवण्यात यावी.
  3. राज्यातील सर्व शेतकरी वीज ग्राहकांचे सवलतीचे वीजदर पुढील कालावधीसाठी नव्याने निर्धारित करण्यात यावेत.
  4. अन्यायी घरगुती व औद्योगिक वीजदरवाढ मागे घ्यावी.
  5. शेतीपंपांची थकीत कनेक्शन तत्काळ द्यावीत.
  6. ग्राहकांना तत्काळ वीजमीटर उपलब्ध करून द्यावीत.
  7. ग्रामपंचायतची स्ट्रीट लाईटची कामे २०१८ पासून बंद आहेत. ती त्वरीत सुरू करावीत.

Intro:अँकर- अन्यायी वीज दरवाढी विरोधात कोल्हापूरात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. महावितरण कंपनीने कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. याविरोधात जेष्ठ नेते प्रा.एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांचेसह हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या महासुल मंत्री चंद्रकांत पाटलांच्या गाड्या अडवून जाब विचारणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. Body:व्हीओ-1- महावितरण कंपनीने कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ही दरवाढ कमी करण्याचे आश्वासन भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते पण सतेवर आल्यापासून राज्यातील कृषीपंप धारक, घरगुती, औद्योगिक ग्राहकांची बेसुमारपणे आर्थिक लूट या सरकारच्या काळात सुरु आहे.वीजनिर्मिती खर्च, प्रशासकीय खर्च आणि वीज गळती यावर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे एका युनिट मागे १ रुपये ९० पैसे खर्च वाढत आहे. देशात सर्वात जास्त महाग वीजपुरवठा करणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र पहिल्या तीन राज्यांमध्ये आहे. यापूर्वी मोर्चा काढून या संदर्भांत सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता . यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वीज दर कमी करू अस आश्वासन दिलं होतं. परंतु अद्याप त्यांनी हे आश्वासन पळाल नसल्याने हजारो शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर विराट मोर्चा काढला असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हंटलंय.

बाईट- राजू शेट्टी (माजी खासदार)

ग्राफिक्स IN-

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी खालील दिलेल्या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही.

१ ) राज्यातील सर्व ४१ लाख शेतीपंप धारक वीज ग्राहकांचे वीज बिले तपासून दुरुस्त व अचूक करण्यात यावी.

२ ) अचूक वीज बिलांच्या आधारे नवीन कृषि संजीवनी योजना राबविण्यात यावी.

३ ) राज्यातील सर्व शेतकरी वीज ग्राहकांचे सवलतीचे वीज दर पुढील कालावधीसाठी नव्याने निर्धारित करण्यात यावेत.

४ ) अन्यायी घरगुती व औद्योगिक वीजदरवाढ मागे घ्यावी.

५ ) शेती पंपाची पेडींग कनेक्शन तात्काळ द्यावीत.

६ ) ग्राहकांना तात्काळ वीज मीटर उपलब्ध करून द्यावीत.

७ ) ग्रामपंचायतची स्ट्रीट लाईटची कामे २०१८पासून बंद आहेत ती त्वरीत सुरू करावीत

ग्राफिक्स आऊट

व्हीओ-2- २०१४ पूर्वी वाढीव वीज बिलांची होळी करणारे, सत्तेवर असल्यास वीजदर स्थिर ठेवण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महावितरणच्या लुटीच्या या धंद्याला साथ दिली आहे. याचा परिणाम शेती, उद्योग, व्यवसाय यांच्या विकास आणि उलाढालीवर तसेच सामान्य कुटुंबियांच्या आर्थिक बजेट होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बाईट- सतेज पाटील (आमदार)

व्हीओ-3- कोल्हापूर च्या दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकऱयांनी वीज दरवाढ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चा दरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या मोर्चानंतर सरकारचे डोळे उघडतात का हे पहावं लागणार आहे.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.