ETV Bharat / state

Almatti Dam : काय आहे अलमट्टी धरणाचा नेमका वाद? अन् राज्यपालांच्या बैठकीत नेमकं काय झालं? वाचा सविस्तर... - Government of Karnataka

Almatti Dam: कर्नाटक सरकारकडून Government of Karnataka अलमट्टी धरणाची Almatti Dam उंची वाढवणेबाबत विचार सुरू आहे. मात्र याला आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या धरणामुळे आसपासचा परिसर जरी पाणीदार बनला असला, तरी त्याचे अनेक तोटे मात्र महाराष्ट्र आता भोगतोय.

Almatti Dam
Almatti Dam
author img

By

Published : Nov 6, 2022, 4:26 PM IST

कोल्हापूर: कर्नाटक सरकारकडून Government of Karnataka अलमट्टी धरणाची Almatti Dam उंची वाढवणेबाबत विचार सुरू आहे. मात्र याला आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या धरणामुळे आसपासचा परिसर जरी पाणीदार बनला असला, तरी त्याचे अनेक तोटे मात्र महाराष्ट्र आता भोगतोय. म्हणूनच या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. काय आहे अलमट्टी धरणाचा नेमका वाद ? काय आहेत नागरिकांच्या अपेक्षा ? राज्यपालांच्या बैठकीत नेमकं काय झालं ? वाचा सविस्तर

काय आहे अलमट्टी धरणाचा वाद कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची जवळपास 5 फुटांनी वाढविण्याबाबत हालचाली सुरू केल्या होते. तशा पद्धतीचा निर्णय सुद्धा झाला होता. मात्र या धरणाची उंची वाढविल्याने त्याचा फटका जो आहे. तो धरणाच्या मागे असलेल्या अनेक गावांसह महाराष्ट्राला सुद्धा बसणार आहे. कारण कोल्हापूर तसेच सांगली हे 2 जिल्हे 2019 आणि 2021 साली ज्या महाप्रलयाला सामोरे गेले आहे. त्याला अलमट्टी धरणाचे सुद्धा एक कारण ठरले. याबाबत अनेक अभ्यासकांनी या अलमट्टी धरणातून महापुरावेळी मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागतो. अन्यथा मागे महापूर ओसरायला सुद्धा वेळ लागतो. याचा दोन्ही वेळा प्रत्यय आला आहे. हे असे असताना आता याच अलमट्टी धरणाची उंची आणखी 5 फुटांनी वाढविण्याबाबत विचार सुरू असल्याने आता महाराष्ट्रातील दोन्ही जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे.

दोन्ही राज्यांमध्ये आपत्ती काळात समन्वय गरजेचे दरम्यान, ज्यावेळी महापुराचा संकटाला मागील जिल्ह्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा अलमट्टी धरणातून मोठा विसर्ग करावा लागतो. त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे याबाबत समन्वय असणे गरजेचे असते. जवळपास 2 लाख क्यूसेकहून अधिक विसर्ग याआधी करण्यात आला आहे. त्यामुळे धरणाच्या पुढे असणाऱ्या अनेक नदीकाठच्या गावांना सुद्धा फटका बसत असतो. त्यामुळे पावसाच्या अंदाजानुसार आणि पूर परिस्थिती नुसार वेळोवेळी आवश्यकतेनुसार मोठा विसर्ग केल्यास त्याचा दोन्ही राज्यांना जो मोठा फटका बसत असतो. तो सुद्धा कमी होण्यास मदत होऊ शकते, असे अनेक अभ्यासकांनी यापूर्वी म्हटले आहे. त्यासाठी दोन्ही राज्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे.

स्वाभीमानीचे कर्नाटक मुख्यमंत्र्यांना निवेदन; जनआंदोलनाचा इशारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या महापुराला कर्नाटकातील ज्या अलमट्टी धरणाला जबाबदार धरले जाते त्याच धरणाची आता आणखी 5 फुटांनी उंची वाढविण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यालाच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. आधीच शेतकऱ्यांना अलमट्टी डॅमचा फटका बसत असताना आणखी उंची वाढविण्याचा निर्णय आमच्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे तात्काळ हा निर्णय रद्द करावा. या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले आहे. शिवाय हा निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

धरणातील पाणी पातळी 517 मीटर मर्यादेत दरम्यान, दोन्ही राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी कोल्हापूरच्या पुरस्थितीला कारण असलेल्या अलमट्टी धारणाबाबत माहिती दिली. यापुढच्या काळात कृष्णा नदीतील पुराचे पाणी प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी आणि पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी अलमट्टी धरणातील पाणीपातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 ते 517.50 मीटर च्या मर्यादेत ठेवले पाहिजे असे मत मांडले.

राज्यपाल यांच्या बैठकीत काय झाल बैठकीत ज्या पद्धतीने जिल्हाधिकारी रेखावर यांनी महापुराचा प्रभाव कमिकरण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण असणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. त्यालाच अनुसरून यापुढच्या काळात दोन्ही राज्यामध्ये चांगले समन्वय असेल, असे स्पष्ट केले आहे. शिवाय धरणाची उंची वाढविण्याबाबत तरी सध्या कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

इतकं मोठं आहे अलमट्टी धरण अलमट्टी अर्थात लालबहादूर शास्त्री सागर हे धरण हे उत्तर कर्नाटकात जे कोल्हापुरातून सुरू झालेल्या कृष्णा नदीवर बांधलेले आहे. जवळपास 200 टीएमसी इतके हे विशाल धरण 17 ते 18 वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झाले आहे. या धरणाच्या भिंतीची लांबी जवळपास 1 हजार 565 मीटर तर उंची 524 मीटर इतकी आहे. या धरणामध्ये 524 मीटर इतकी पाणीपातळी झाल्यावर पाण्याचा साठा 200 टीएमसी इतका होतो, तर पाणीपातळी 519 मीटरपर्यंत राहिली तर पाणीसाठा 123 टीएमसी इतका होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.