ETV Bharat / state

'कोल्हापूर डॉग हाऊस' ठरतेय पूरग्रस्त भागात अडकलेल्या श्वानांसाठी हक्काचे घर - kolhapur rain

महापुरात अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागते. मात्र, काहींच्या घरात श्वान असतात त्यांचे काय करायचे असा प्रश्न अनेकांना असतो. त्यांच्यासाठी कोल्हापूरातल्या पारीख पूल परिसरात राहणारा सुमित माणगावे हा तरुण समोर आला आहे. त्याने घराच्या टेरेसवरच पूरग्रस्त भागातील श्वानांसाठी हॉस्टेल तयार केले आहे

'कोल्हापूर डॉग हाऊस
'कोल्हापूर डॉग हाऊस
author img

By

Published : Jul 25, 2021, 1:43 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरात पुन्हा एकदा आलेल्या अस्मानी संकटामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. लोकं स्थलांतर करून सुरक्षित स्थळी जाऊ शकतात. आपापल्या नातेवाईकांकडे सुद्धा जाऊ शकतात. मात्र, अनेकांच्या घरात पाळलेले श्वान असतात त्यांचं काय ? अनेकांना स्थलांतर करताना हा प्रश्न असतोच तर नाहीतर त्यांना सोडून द्यावे लागते. मात्र, कोल्हापूरात एक तरुण अशा अडचणीत असलेल्या पूरग्रस्तांसाठी समोर आला असून आपल्या घराच्या टेरेसवर श्वानांचे हॉस्टेलच तयार केले आहे. कोण आहे हा तरुण आणि त्याला ही अनोखी समाजसेवा करण्याची कल्पना का सुचली यावरचा हा विशेष रिपोर्ट.

'कोल्हापूर डॉग हाऊस'

कोल्हापूरातले 'हे' तरुण आले समोर
महापुरात अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागते. मात्र, काहींच्या घरात श्वान असतात त्यांचे काय करायचे असा प्रश्न अनेकांना असतो. त्यांच्यासाठी कोल्हापूरातल्या पारीख पूल परिसरात राहणारा सुमित माणगावे हा तरुण समोर आला आहे. त्याने घराच्या टेरेसवरच पूरग्रस्त भागातील श्वानांसाठी हॉस्टेल तयार केले आहे. श्वानांची प्रचंड आवड असल्याने त्याने महापुरात अडकलेल्या श्वानांचे पालकत्व स्वीकारले आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीने मुक्या प्राण्यांसाठी कोणीतरी समोर आल्याने अनेकांकडून याचे स्वागत केले जात आहे. दरम्यान, श्वानांची कशा पद्धतीने काळजी घेतली जावी आणि इतर सर्वच गोष्टींसाठी सुमितने त्याचे प्रशिक्षण सुद्धा घेतले आहे.

श्वानांसाठी हक्काचे घर
श्वानांसाठी हक्काचे घर
अनेक श्वानांना मिळाला आसरासुमित माणगावे याने सुरू केलेल्या या श्वानांच्या हॉस्टेलमध्ये अनेकांनी आपली श्वान सुपूर्द केली आहेत. यामध्ये अनेक महागडे श्वान सुद्धा आहेत. सुमित या सर्वांची आपल्या घरातील सदस्यांप्रमाणेच काळजी घेत असून सर्वच श्वान सुमितच्या 'डॉग हाऊस'मध्ये चांगलीच रुळली आहेत. जवळपास 18 ते 20 श्वान सद्या त्याच्याकडे असून पुरबाधित क्षेत्रातील लोकांनी आपली श्वान आपल्याकडे देऊ शकता असे आवाहन सुद्धा त्याने केले आहे.

मित्रांचीही सुमितच्या या कार्यात मदत
सुमितच्या या कार्यात त्याच्या घरच्यांचा सुरुवातीला विरोध झाला. मात्र, नंतर त्याच्या घरचे सुद्धा तयार झाले. सुमितचा भाऊ आदित्य माणगावे याच्यासह गौरव पाटील आणि अथर्व जाधव या मित्रांची सुद्धा त्याला मोठी मदत होत आहे. श्वानांना त्यांचे मालक चांगल्या पध्दतीने हाताळत आहे. सकाळी फिरायला घेऊन जाण्यापासून त्यांची इतर निगा सुद्धा ते राखत असतात. स्वतः हा खर्च उचलत आहे. दरम्यान, सुमितच्या या अनोख्या उपक्रमाची जिल्ह्यात चर्चा सुरू असून अनेकजण त्याच्याकडे आपले श्वान देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.