ETV Bharat / state

कोल्हापूर महापालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; २२ जणांना नोटिसा - Commissioner Dr. kadambari Balakwade

महापालिकेमध्ये कामावर उशिरा आलेल्या २२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, विनामास्क आढळलेल्या ३२ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि ओळखपत्र नसलेल्या ७ कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ताकीद दिली आहे.

Commissioner Dr. kadambari Balakwade
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे
author img

By

Published : Nov 18, 2020, 5:18 PM IST

कोल्हापूर - महापालिकेमध्ये कामावर उशिरा आलेल्या २२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, विनामास्क आढळलेल्या ३२ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि ओळखपत्र नसलेल्या ७ कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ताकीद दिली आहे. महापालिकेमध्ये शिस्त मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त बलकवडे यांनी दिला आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज महापालिकेतील विविध विभागांना भेट दिली. यावेळी कार्यालयीन कामकाजात शिस्त, स्वच्छता, टापटीप, पारदर्शकता आणि लोकाभिमुखतेला प्राधान्य देण्यात आले असून, त्या अनुषंगाने उचित कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या.

कारवाई करण्यात आलेले विभाग -

महापालिकेतील लेट आलेल्या २२ कर्मचाऱ्यांमध्ये मुख्य लेखापाल ७, मुख्य लेखापरीक्षक २, रेकॉर्ड विभाग ३, पवडी अकांऊट विभाग ७ आणि भांडार विभागाच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, विनामास्क आढळलेल्या विविध विभागातील ३२ कर्मचाऱ्यांकडून ३ हजार २०० रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कार्यालयीन कामाच्यावेळी ओळखपत्र नसलेल्या विविध विभागातील ७ कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे.

आयुक्त डॉ. बलकवडे यांची सर्वच विभागांना भेट -

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज महापालिका इमारतीतील विविध विभागांना सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानकपणे भेट देऊन विनामास्क कर्मचारी, उशिरा येणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. तसेच, नागरी सुविधा केंद्र, पार्किंग, खासगी वाहनांना प्रवेश याबाबत संबंधितांना निर्देश दिलेत.

महापालिकेत आता खाजगी वाहनांना प्रवेश बंद -

महापालिका इमारती परिसरात खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्याबरोबरच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वाहनांच्या सिंगल पार्किंगसाठी तात्काळ पट्टे करण्याची सूचना आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहर अभियंतांना दिली. तसेच, महापालिका इमारतीतील सुविधा केंद्रामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी चौकोन तयार करण्याची सूचनाही आयुक्तांनी दिली. त्याचबरोबर, पदाधिकारी, तसेच पक्षकार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सेवा अन्य विभागाकडे वसुलीसाठी तात्काळ वर्ग करण्याचे निर्देशही आयुक्त बलकावडे यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

निवेदन देताना केवळ ५ जणांना परवानगी -

महापालिकेमध्ये येणारे मोर्चे, तसेच आंदोलनकर्ते यांच्याकडून निवेदन देण्यासाठी महापालिकेत येताना केवळ पाच जणांना प्रवेश दिला जाईल. तसेच, महापालिकेत येणाऱ्या प्रत्येकाने कोरोनाच्या अनुषंगाने मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतराचे पालन, ऑक्सिजन व टेम्प्रेचर तपासणी करण्याची सूचनाही आयुक्त बलकवडे यांनी संबंधित विभागाला केली.

हेही वाचा - जमिनी लाटण्यास हातभार लावणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, कोल्हापुरातील ख्रिस्ती समाजाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.