ETV Bharat / state

महापुरात घर पडलं, तरीही येत आहे 'लाईट बिल'... कागल तालुक्यातील प्रकार - electric connections in kolhapur

मागील वर्षी महापुरात घर पडल्याने विजेचं मीटर पडलेल्या भिंतीत गाडलं गेलं. मात्र, महावितरणची 'किमया' अशी की, या परिस्थितीत देखील दर महिन्याला वीज बिल येत आहे. विशेष म्हणजे वापरही होत नसताना या गरीब कुटुंबाच्या नावाने विजेचं बिल निघत आहे.

electric connections in kolhapur
महापुरात घर पडलं, तरीही येत आहे 'लाईट बिल'... कागल तालुक्यातील प्रकार
author img

By

Published : Dec 16, 2020, 12:45 PM IST

Updated : Dec 16, 2020, 1:23 PM IST

कोल्हापूर - मागील वर्षी महापुरात घर पडल्याने विजेचं मीटर पडलेल्या भिंतीत गाडलं गेलं. मात्र, महावितरणची 'किमया' अशी की, या परिस्थितीत देखील दर महिन्याला वीज बिल येत आहे. विशेष म्हणजे वापरही होत नसताना या गरीब कुटुंबाच्या नावाने विजेचं बिल निघत आहे. कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील निनाबाई चिखली गावात हा प्रकार समोर आलायं. या प्रकरणाबाबत 'ईटीव्ही भारत'ने सविस्तर माहिती घेतल्यानंतर आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

महापुरात घर पडलं, तरीही येत आहे 'लाईट बिल'... कागल तालुक्यातील प्रकार

घर पडलं तरी वीजबिल सुरूच

सासर वेगळं असलं तरी वृद्ध आईच्या सेवेसाठी शकुंतला घाडगे आपले पती शिवाजी घागडे यांच्यासह निनाबाई चिखली गावात राहतात. गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शकुंतला यांच्या आईचे घर जमीनदोस्त झाले. याच भिंतीखाली घाडगे यांच्या प्रापंचिक वस्तू सुद्धा गाडल्या. यामध्ये घरासाठी बसवलेलं मीटर देखील होत. मात्र त्यांना अद्याप बिल येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पडक्या घरात संसार

महापूर ओसरल्यानंतर पुन्हा याच पडक्या घरात संसार सुरू करायचा प्रयत्न शिवाजी घाडगे यांनी केला. नवीन वीज कनेक्शन घेताना तांत्रिक अडचण म्हणून अंधारातच हा संसार सुरू झाला. पण आधी नवीन वीज कनेक्शन द्यायला तांत्रिक अडचण आली. त्याचसोबत पडलेल्या भिंतीखाली गाडलेल्या मीटरचे रीडिंग घेऊन शिवाजी घाडगे यांना वीजबिल पाठवले आहे. शिवाय ते वसुलही करण्यात आले आहे.

महापुरातील नुकसान भरपाई अद्याप नाही

एकीकडे महावितरणच्या या विचित्र कारभारामुळे चिंतेत असलेल्या घाडगे यांना अद्याप महापुरामुळे नुकसान झालेली मदत सुद्धा मिळाली नाही. त्यामुळे घाडगे यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

समरजित घाटगे यांच्याकडे शिवाजी घाडगेंनी मांडल्या व्यथा

शाहू घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे गेल्या काही दिवसांपासून जनपंचायतच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. कागल दौऱ्यावर असताना शिवाजी घाडगे यांनी समरजित घाटगेंसमोर आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानंतर समरजित यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला असून शिवाजी घाटगे यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.

वीजबिलाच्या घोळाबरोबरच पडलेल्या घरासाठी मदत करावी

शिवाजी घाडगे यांच्यासारखे अनेक शेतकरी कष्टकरी आहेत, जे आपलं कनेक्शन कायमचं बंद होऊ नये, एकाच वेळी जास्त रक्कमेचे बिल येऊ नये, म्हणून नाईलाजाने बिल भरत आहेत. एकीकडे महापुरात घाडगे यांचं घर पडलं. त्याची मदत अद्याप शासनाकडून मिळाली नाही. त्यातच आता वीजबिल येत असल्याने त्यांच्यासामोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच महावितरणचा हा विचित्र कारभार या निमित्ताने समोर आला आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शिवाजी घाडगे यांनी केली आहे.

Last Updated : Dec 16, 2020, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.