ETV Bharat / state

'त्या' वक्तव्यावरून शेट्टींना निवडणूक आयोगाची नोटीस; मागितला खुलासा

निवडणूक आयोगाने राजू शेट्टींना ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत २४ तासांत खुलासा करावा, अशी नोटीस बजावली आहे.

राजू शेट्टी
author img

By

Published : Apr 6, 2019, 6:02 PM IST

कोल्हापूर - शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत २४ तासांत खुलासा करावा, अशी नोटीस हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी बजावली आहे.

शेट्टी यांनी कुलकर्णी, देशपांडे, आणि जोशी आडनावाच्या व्यक्‍ती सैन्यात कधीच भरती होत नाहीत, शेतकर्‍यांची मुलेच सैन्यात असतात, असे वक्‍तव्य केले होते. या वक्‍तव्याविरोधात विविध संघटनांनी शेट्टी यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे याबाबत खुलासा करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने शेट्टींना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात २४ तासांत खुलासा येणे अपेक्षित आहे. खुलासा आल्यानंतर त्याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल, असे काटकर यांनी सांगितले.

Intro:अँकर- कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार राजू शेट्टी यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत २४ तासांत खुलासा करावा, अशी नोटीस खा. राजू शेट्टी यांना बजावण्यात आली आहे . हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी याबाबतचे आदेश दिले. शेट्टी यांनी कुलकर्णी, देशपांडे, जोशी आडनावाच्या व्यक्‍ती सैन्यात कधीच भरती होत नाहीत, शेतकर्‍यांची मुलेच सैन्यात असतात, असे वक्‍तव्य केले होते. या वक्‍तव्याविरोधात विविध संघटनांनी शेट्टी यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर याबाबत खुलासा करण्याची नोटीस त्यांना देण्यात आली. ही नोटीस शेट्टी यांना बजावण्यात आली आहे.त्याचा खुलासा २४ तासांत येन अपेक्षित आहे. खुलासा आल्यानंतर त्याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल, असे काटकर यांनी सांगितले.Body:(बाईट नाही देत .. शेट्टींचा vis वर चालवा)Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.