ETV Bharat / state

Vishalgad Part Collapsed : आधी पन्हाळा आणि आता विशाळगडाचा बुरुज ढासळला; दुर्गसंवर्धन मोहिम कागदावरच! - कोल्हापुरातील विशाळगड किल्ला दुरवस्था

मुसळधार पावसामुळे विशाळगडाचा बुरुज ( Vishalgad collapsed due to heavy rain ) ढासळला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र गेल्या शेकडो वर्षांपासून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत गडकिल्ले पाय घट्ट रोवून उभे आहेत. तेच आता ढासळत चालले असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Vishalgad Part Collapsed
Vishalgad Part Collapsed
author img

By

Published : Jul 14, 2022, 5:24 PM IST

कोल्हापूर - विशाळगडावरील बुरुज सुद्धा आता ढसाळला आहे. आज ( गुरुवारी ) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे ( Vishalgad collapsed due to heavy rain ) अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र गेल्या शेकडो वर्षांपासून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत गडकिल्ले पाय घट्ट रोवून उभे आहेत. तेच आता ढासळत चालले असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. नुकतंच पन्हाळा गडावरील सुद्धा बुरुजाचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर कोल्हापुरात संवर्धनाच्या मागणीसाठी एक चळवळ उभी राहत आहे. असे असतानाच आता विशाळगडाचा सुद्धा बुरुज कोसळला आहे.

ढासळलेला बुरुज
ढासळलेला बुरुज

पर्यायी मार्गावरून ये जा सुरू : दरम्यान, विशाळगडावर जाण्यासाठी लोखंडी जिना आहे. त्याच्या बाजूलाच असणारा दगडी बुरुज ढासळला असून हा लोखंडी जिना ये जा करणेसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी, नागरिकांनी पर्यायी रोडने गडावर येत- जात करावी असे आवाहन करण्यात आले आहे. शाहूवाडी पोलिसांनी याबाबत माहीती दिली. दरम्यान, पन्हाळा गडानंतर आता विशाळगड सुद्धा ढासळत चालला असल्याने प्रशासनाचे गडकिल्ल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल सुद्धा शिवप्रेमी करत आहेत.

ढासलेल्या बुरुजाचा भाग
ढासलेल्या बुरुजाचा भाग

पन्हाळगडाची दुरवस्था : काही दिवसांपूर्वीची पन्हाळगडाच्या दुरवस्थेची बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. ज्यात पन्हाळ्याकडे ( Panhala fort Kolhapur ) आता प्रशासनासह पुरातत्व विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले होते. याच गडाच्या अनेक ऐतिहासिक बुरुज आणि वास्तू दिवसेंदिवस ढासळत चालल्या आहेत तर काही ढासळण्याच्या मार्गावर आहेत. नुकतेच चार दरवाजा जवळील नेबापुर व मंगळवार पेठकडे जाण्याच्या पायवाट मार्गावरील ऐतिहासिक तटबंदीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. मात्र याकडे प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विशाळगडाकडे तरी लक्ष देणारा का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गडकिल्ले वाचवा मोहिम : पन्हाळगडाची दुरवस्था दाखविल्यानंतर शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींनी गडकिल्ले वाचावा, अशी मोहिती हाती घेतली आहे. यासाठी कोल्हापुरात शिवप्रेमींनी एकत्र येत 'पन्हाळा वाचावा' असे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे यासंदर्भात सोशल मीडियावरही अनेकांनी पुरातत्व विभाग आणि शासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Panhala Fort Kolhapur : राजं...! मला वाचवा !! पन्हाळा गडाच्या ऐतिहासिक बुरुज आणि वास्तूंची दुरावस्था

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.