कोल्हापूर - मोबाईलवर बोलत वाहन चालवताना आपण अनेकांना पाहतो. अशी लोक त्यांच्या बेजबाबदारीमुळे स्वत:सह इतरांनाही संकटात आणतात. मोबाईलवर बोलत वाहने चालवल्यामुळे अनेकदा अपघात घडल्याचे समोर आले आहे. तरीही अनेकजण हा जीवावरचा खेळ करत रस्त्याने चाललेली दिसतात. यावर लोकांमध्ये जागृती करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून हटके पद्धतीने ट्विट करण्यात आले आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात - फडणवीस
कोल्हापूर पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये यमाला मोबाईलवर बोलताना दाखवण्यात आले आहे. रागावलेला यम "लक्षात ठेवा गाडी चालवत असताना तुमचा फोन मला सुद्धा लागू शकतो", असे म्हणताना दाखवले आहे. तर खाली एक दुचाकीस्वार मोबाईवर बोलताना दाखवण्यात आला असून त्याचा फोन यमाला जोडला गेल्याचे दर्शवण्यात आले आहे. वाहन चालवताना मोबाईल वापरू नका, असे कॅप्शन त्यावर देण्यात आले आहे.
केंद्र सरकारपासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत वारंवार वाहन चालवताना मोबाईल वापरू नये, याविषयी जनजागृती करण्यात येते. तरीही अनेकजण सर्रास वाहन चालवताना मोबईलवर बोलताना दिसून येतात. अशिक्षित लोकांबरोबरच सुशिक्षित लोकही मोबाईलवर बोलताना दिसून येतात. त्यामुळे अनेकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
-
DON'T USE Mobile while Driving...#mobile@DGPMaharashtra pic.twitter.com/0ul2h3ONQz
— KOLHAPUR POLICE (@KOLHAPUR_POLICE) December 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">DON'T USE Mobile while Driving...#mobile@DGPMaharashtra pic.twitter.com/0ul2h3ONQz
— KOLHAPUR POLICE (@KOLHAPUR_POLICE) December 24, 2019DON'T USE Mobile while Driving...#mobile@DGPMaharashtra pic.twitter.com/0ul2h3ONQz
— KOLHAPUR POLICE (@KOLHAPUR_POLICE) December 24, 2019