कोल्हापूर - येथील सीपीआर मधील उच्च पदस्थ असणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा घशात खवखव आणि कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत तपासणीसाठी पाठविले आहेत. परवा सकाळी या टेस्टचा अहवाल सीपीआरमध्ये येणार असल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती समोर येताच कोल्हापूरसह सीपीआर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापुरात अद्याप कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, परदेशातून कोल्हापुरात येणार्या नागरिकांची कटाक्षाने कोरोना तपासणी केली जात आहे. अशातच सीपीआरमधील उच्च पदस्थ डॉक्टरांनी स्वतःचे स्वॅब टेस्टसाठी पाठवले असल्यामुळे परिसरात काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - घाबरू नका..! कोल्हापुरात 'कोरोना' नाही; खबरदारीसाठी प्रशासन सज्ज
सीपीआर रुग्णालयात १२ मार्च अखेरपर्यंत जवळपास ४४ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यातले चौघे संशयित वाटत असल्याने त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पुढे पाठवले होते. त्यातल्या एका रुग्णाचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाकीच्या तिघांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नसून त्यामध्ये सीपीआरमधल्या डॉक्टरांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनसुद्धा याबाबत सतर्क झाले असून योग्य ती खबरदारी घेत आहेत.
हेही वाचा - कोल्हापुरात कोरोनाचा रुग्ण नाही - जिल्हाधिकारी देसाई