ETV Bharat / state

Navratri 2022 : अंबाबाई मंदिर दुमजली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? वाचा इतिहास - Navratri Culture

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी ( Shree Karveer Niwasini Ambabai ) देशभरातील अनेक भाविक येत असतात. अंबाबाईच्या दर्शनाबरोबरच मंदिर परिसरातील काही छोट्या मंदिरातील ( Kolhapur Ambabai Temple ) देवी देवतांचे दर्शन घेऊन जातात मात्र आजही अनेकांना अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिराबाबत माहिती ( Matrilinga Temple in Ambabai Temple ) नाहीये.

Kolhapur Ambabai Temple
अंबाबाई मंदिर
author img

By

Published : Sep 18, 2022, 11:21 AM IST

Updated : Sep 18, 2022, 1:06 PM IST

कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी ( Shree Karveer Niwasini Ambabai ) देशभरातील अनेक भाविक येत असतात. अंबाबाईच्या दर्शनाबरोबरच मंदिर परिसरातील काही छोट्या मंदिरातील ( Kolhapur Ambabai Temple ) देवी देवतांचे दर्शन घेऊन जातात मात्र आजही अनेकांना अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिराबाबत माहिती ( Matrilinga Temple in Ambabai Temple ) नाहीये. खरंतर अंबाबाई मंदिर हे देशातील एकमेव मंदिर आहे. ज्यामध्ये मंदिराच्यावर अजून एक मंदिर आहे. कुठे आहे हे मंदिर आणि काय आहे याबाबत अधिक माहिती पाहुयात या विशेष रिपोर्ट मधून..

अंबाबाई मंदिर

देशातील एकमेव दुसऱ्या मजल्यावरील मंदिर - साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराची Navratri 2022 उभारणी चालुक्यांच्या काळात इ.स. 700 च्या आसपास म्हणजेच सुमारे 1200 वर्षांपूर्वी झाल्याचे बोलले जाते. देशातील एकमेव दुसऱ्या मजल्यावरील मंदिर असून गर्भगृहात मातृलिंग आणि चौथऱ्यावर गणेशाची ( two floors temple in the country) मूर्ती आहे. अतिप्राचिन मंदिरापैकी हे एक महत्वाचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरं देखील आहेत. मंदिराच्या बांधणी आणि रचनेत अनेक वैशिष्ट्ये Navratri Culture आढळतात. अनेक वैशिष्टयांपैकी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मातृलिंग ( Matrilinga Temple Kolhapur ) मंदिर. अनेकांना हे कुठे आहे हे माहिती नाही, अनेकांना मातृलिंग मंदिराबाबत माहिती सुद्धा नाही तर अनेकांना माहिती असून त्या ठिकाणी जाता येत नाही. कारण वर्षांतून काही ठराविक वेळच हे मंदिर उघडले जाते. अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत रचनेत दोन मजले करण्यात आले आहेत खाली गाभाऱ्यात करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती असून तिच्या डोक्यावरच म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे. खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती आहे. त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर नंदी आणि गर्भगृहात मातृलिंग आणि चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती असून याच मंदिरावर मुख्य शिखर आहे. या मंदिरात जाण्यासाठी चिंचोळ्या गुप्त पायऱ्या आहेत. पण वर्षातील केवळ मोजक्या दिवशी हे मंदिर दर्शनासाठी उघडले जाते. देशामध्ये कुठेही असे दुमजली मंदिर नसून अंबाबाई मंदिर हे एकमेव उदाहरण असल्याचे सांगितले जाते. अंबाबाईच्या मूर्तीच्या शेजारी ज्या पद्धतीने तीन वेगवेगळ्या खोल्या आहेत त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर सुद्धा छोट्या छोट्या तीन खोल्या आढळतात. त्याला 'ध्यान गृह' असेही म्हंटले जाते. मंदिराच्या याच रचना आणि बांधणीमुळे मंदिराला आणखी विशेष बनवते.

वर्षातून केवळ 3 वेळा मंदिराचे दरवाजे उघडतात - मातृलिंग मंदिरात भक्तांना दररोज दर्शनासाठी प्रवेश नाहीये. मात्र वर्षातून 4 वेळा मंदिर उघडले जाते. श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारी, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री आणि दररोज साडे बारा वाजता आरती होत असते त्या आरतीवेळी काही काळासाठी दरवाजा उघडला जातो. श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारी, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री या तिन्ही वेळा आम भक्तांसाठी मातृलिंग मंदिर दर्शनासाठी खुले केले जाते.

Last Updated : Sep 18, 2022, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.