कोल्हापूर - राजू शेट्टींचे राजकीय धोरण देशभरात मोठे असले तरीही सामान्य माणसांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी होती. त्यामुळे मला जनतेनी निवडणून दिले आहे. शिवाय स्वतःपुरते राजकारण केल्यास पराभव पत्कारावाच लागतो, असे नुतन खासदार धैर्यशील माने म्हणाले. हातकणंगले मतदारसंघातून त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
हातकणंगलेतील तरुणाईने भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे तरुणाईचे भवितव्य घडवण्यासाठी लोकसभेत निघालो असल्याचे माने यावेळी म्हणाले. तसेच सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास साधायचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नुकताच गुरुवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. त्यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा पराभव केला.