ETV Bharat / state

Karveer Nivasini Ambabai: करवीर निवासिनी अंबाबाईला भक्ताकडून ४७ तोळ्यांचा सोन्याचा किरीट अर्पण

करवीर निवासिनी अंबाबाई देवीला देशभरातील भक्तांकडून सोने-चांदीचे अलंकार अर्पण केले जातात. अशाच काही भक्तांनी आई अंबाबाई देवीला सुमारे ४७ तोळ्याचा सोन्याचा किरीट अर्पण केला आहे. हे किरीट तब्बल २४ लाख रुपये किमतीचे आहे. हे झगमगीत किरीट शनिवारी देवीला चढवण्यात आले आहे.

Karveer Nivasini Ambabai
करवीर निवासिनी अंबाबाई
author img

By

Published : May 8, 2023, 10:01 AM IST

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रोज लाखो भावी दर्शनासाठी येत असतात. आईचे दर्शन मिळावे, यासाठी तासानतास रांगेत उभे राहतात. येथे भाविक मोठ्या मनाने आपाल्याला शक्य असेल तेवढे सेवेसाठी दान देखील करत असतात. जालना येथील अध्यात्मिक संस्थांनने शुक्रवारी ४७० ग्रॅम वजनाचे शुद्ध सुवर्णजडित किरीट देवीला अर्पण करायचे ठरवले होते. यासाठी संस्थांनचे पुजारी आणि काही पदाधिकारी शनिवारी किरीट घेऊन मंदीरात आले होते. त्यांनी तो देवीला अर्पण करून दर्शन घेतले.

अंबाबाईला सोन्याचा किरीट अर्पण : या किरटाची अंदाजे किंमत २४ लाख रुपये आहे. या किरीटाचे देवीच्या पायातून पूजन देखील करण्यात आले. यानंतर किरीट देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. तर समितीने साडी चोळी व प्रसाद देऊन या भाविकांचा सत्कार केला. देवीला दर वर्षी मोठ्या प्रमाणात सोने चांदी आणि पैशाच्या रूपात देणगी मिळत असते. गेल्या काही वर्षात यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

मौल्यवान दागिन्यांची तपासणी : काही महिन्यापूर्वी कलकत्ता येथील एका भक्ताने ३२ लाख रुपये किमतीचा सोन्याचा किरीट अर्पण केले. तर कराड येथील अभिजीत पाटील यांनी पाच तोळे वजनाचे स्वर्ण किरीट देवीला अर्पण केले होते. देवीच्या खजिन्यात निजामकालीन तसेच संस्थानकालीन अनेक दागिन्यांसह देवीच्या नित्यालंकाराचा समावेश आहे. खजिन्यात सुमारे शंभर किलोहून अधिक सोने आणि चांदी आहे. गर्व्हमेंट व्हॅल्युएटरमार्फत देवीला अर्पण केलेल्या सर्व मौल्यवान दागिन्यांची तपासणी केल्यानंतर ते खजिन्यात जमा केले जाते, अशी माहिती देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.

हेही वाचा : Ambabai mandir : अंबाबाई मंदिरातील जुना लाकडी दरवाजा बदलला; नवीन सागवानी दरवाजा सेवेत
हेही वाचा : Ambabai Darshan : नववर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनाने; 40 हजारांहून अधिक भविकांनी घेतले दर्शन
हेही वाचा : Ambabai Temple : अंबाबाई मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाचा धिंगाणा; पोलीस स्टेशनमध्येच काढले कपडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.