ETV Bharat / state

Deepak Kesarkar Reaction: शिंदे गटाच्या 'त्या' वादग्रस्त जाहिरातीवर मंत्री दीपक केसरकर म्हणाले...

शरद पवारांनी ज्या पद्धतीने उठाव केला, त्याला जनतेने स्वीकारले होते. त्यांचा उठाव आणि आमची गद्दारी असे कसे होईल? असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

Deepak Kesarkar Reaction
पालकमंत्री दीपक केसरकर
author img

By

Published : Jun 29, 2023, 7:49 PM IST

माहिती देताना दीपक केसरकर

कोल्हापूर : शरद पवारांनी ज्या पद्धतीने उठाव केला त्याला जनतेने स्वीकारले होते. त्यांचा उठाव हा उठाव आणि आमची गद्दारी असे कसे होईल? असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला होता म्हणून आम्ही उठाव केला. महाराष्ट्राच्या इतिहासात असा उठाव फक्त दोनदा घडला. शरद पवार यांनी उठाव केला त्यानंतर ते चार वेळा मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

घरच्या लोकांमुळे पक्ष अडचणीत : तसेच शिवसेनेसारखा एवढ्या मोठ्या पक्षाची फरफट झाली. मूळ पक्ष बाजूला गेला, एवढी वर्षे नेतृत्व करणारी माणसे बाजूला गेली. याचे आम्हालाही दुःख होते. मात्र असे सल्ले घेतले की, घरच्या लोकांमुळे पक्ष कसा अडचणीत येतो, हे सगळा महाराष्ट्र बघत आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

पहिल्यांदाच अशी शासकीय महापूजा : आज आषाढी एकादशी असल्याने, पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. दरवर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडत असते. मात्र अनेक मुख्यमंत्री हे आजपर्यंत केवळ पूजेसाठी येत होते. मात्र एकनाथ शिंदे हे दोन दिवस आधीच पंढरपूरमध्ये दाखल झाले. तसेच त्यांनी प्रत्येक कामाची पाहणी केली. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत दीपक केसरकर यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले आहे.

वारीचे नियोजन करण्यासाठी विठ्ठल भक्त व्हावे लागते : काही लोक मुख्यमंत्री झाले म्हणून पंढरपूरला येऊन पूजा करतात, पण वारीचे नियोजन करण्यासाठी विठ्ठल भक्त व्हावे लागते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री नाही तर भक्त होऊन शेतकरी परंपरा जपली. दोन दिवस आधी येऊन त्यांनी कोणत्याही वारकऱ्याला त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले. यंदा पहिल्यांदाच शासकीय महापूजा सुरू असताना देखील भाविकांना दर्शन घेता आले. तर पंढरपूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निधीही जाहीर केला आहे.

आम्ही दोघांचे नेतृत्व मान्य करत : येत्या 2024 नंतर मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आल्यानंतर फडणवीस यानी अत्यंत सावध उत्तर दिले आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संसदीय बोर्डच घेणार असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तर फडणवीस यांच्या या विधानावर मंत्री दीपक केसरकर यांनीही सूचक विधान केले. मुख्यमंत्री कोण होणार हे दोघांनी मिळून ठरवायचे आहे. या अगोदर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे सांगत होते. काही ऍडजेस्टमेंट असू शकते. पहिले तुम्ही व्हा, मी नंतर होतो असे ही होऊ शकते. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा म्हटले होत. आम्ही दोघांचे नेतृत्व मान्य करतो. राज्याला आश्वासक चेहरा लाभलेला आहे.

संजय राऊत हा कोणताही विचार न करता बोलणार व्यक्तिमत्व : यावेळी त्यांनी शिंदे गटाने दिलेल्या वादग्रस्त जाहिरातीवरही भाष्य केले असून, मुळात ही जाहिरात मुख्यमंत्र्यांना दाखवून दिलेली नव्हती. ज्या दिवशी हे जाहिरात देण्यात आली, त्या दिवशी रात्री याबाबतची माहिती त्यांना मिळाली. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ही जाहिरात थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र रात्री उशीर झाल्याने तोपर्यंत जाहिराती प्रिंटिंगला गेल्या होत्या. त्यामुळे त्यात बदल करणे शक्य नव्हते. नंतर दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात दिली असे केसरकर म्हणाले आहेत. हे सरकार औटघटकेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. संजय राऊत हा कोणताही विचार न करता बोलणार व्यक्तिमत्व आहे. औटघटकेच सरकार म्हणारे संजय राऊत कोण आहेत? संजय राऊत यांना फारसे सीरियस घेऊ नका असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Deepak Kesarkar News: खुशखबर! मराठी तरुणांना मिळणार आता जर्मनीत रोजगार- दिपक केसरकर
  2. Deepak Kesarkar on Sindhudurg Visit : उद्धव ठाकरेंमुळेच सगळे तुटले, धनुष्यबाण आमचाच - शिक्षणमंत्री दिपक केसरकर
  3. Sanjay Raut Warning To Kesarkar : दीपक केसरकरांनी 2024 मध्ये जेलमध्ये जाण्याची तयारी करावी; संजय राऊतांचा पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.