कोल्हापूर : ठाकरे गटाकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सुप्रीम कोर्टात प्रकरण (Dussehra Melawa case in Suprime Court) असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला परवानगी हवी असती तर आमच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला मिळाली असती. दसरा मेळाव्यात (Dussehra Melawa) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही, याची सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना द्यावी. परवानगी आधी कोणी मागितली त्यावर हा निर्णय देण्यात आला. ते कोल्हापूरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, की न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे ठाकरे गटाने पालन करावे, असे प्राथमिक शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar opinion on Dussehra Melawa) यांनी म्हटले. आम्ही दसरा मेळाव्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार नाही असेही त्यांनी म्हटले. शिवाय आमचा जो मेळावा होईल तो त्यांच्या तुलनेत कितीतरी पटीने मोठा असेल, आणि तो शांततेत पार पडेल असेही केसरकर म्हणाले.
आमचा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा : यावेळी केसरकर म्हणाले, आमचा मेळावा त्यांच्यापेक्षा मोठा असेल. शिवाय आमचा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा असेल. या मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्थान नसेल हेच स्पष्ट केले जाईल. ठाकरे गटाच्या मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचं सोनं लुटायचं असेल हे बाळासाहेबांनी कधीच होऊ दिलं नसतं. जर तसं होणार असेल तर मी काही बोलू शकत नाही असेही त्यांनी म्हटले.
भाविकांसाठी मोफत रिक्षाची सोय करणार : नवरात्र उत्सव काळात 25 लाख भाविक देवीच्या दर्शनाला येतील असा अंदाज आहे. त्यामुळे शहरात बारा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मोफत रिक्षाची व्यवस्था करू असेही त्यांनी म्हंटले यामध्ये सामाजिक भावनेतून रिक्षाची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याची पालकमंत्री म्हणून माझी भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिवाय पेड ई पास वादाबाबत विचारले असता ते म्हणाले, न्यायालयीन प्रकरणात मी बोलणार नाही. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लावण्यात आलेल्या पेड पासबाबत जो निर्णय न्यायालय देईल तो आम्हाला मान्य असेल असेही ते म्हणाले.
मूर्ती रासायनिक प्रक्रिया वाद : देवीची मनापासून भक्ती करा, राजकारण करू नका. ठाकरे गटाच्या शिवसेनेला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी टोला लगावला. बाळासाहेबांचा शिवसैनिक मनापासून देवीची भक्ती करतो, त्यामुळे हा निर्णय सकारात्मक घेईल. शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. मात्र अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेबदल मला बोलायचं नाही. मला कोणाशी वाद घालायचं नाही, मला कोल्हापूरचा विकास करायचा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.