नागपूर : मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणातून कोल्हापुरातील दोघांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, आज या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. आज सकाळी कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन बंदचे आवाहन केले. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्यात याचा शोध घ्यावा लागेल. जाणूनबुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे हे कोण कारीत आहे, हे तपासून बघावे लागेल. कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पूर्णपणे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही : कोणीही कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी खराब होणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. तसेच कायदा कोणी हातात घेऊ नये. कोणत्याही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही. या ठिकाणी कधीही औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ शकणार नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पण हे जे कोणी करत आहेत हे शोधून काढावे लागेल आणि आम्ही ते शोधून काढू. मात्र महाराष्ट्र कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच, पण त्यासोबत महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे त्याच्यावरही कुठेतरी डाग लागतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की, कोणीही कायदा हातात घेऊ नये. कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल. शरद पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही. महाराष्ट्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण होणार तर संताप निर्माण होतोच, फक्त अशा प्रकारच्या संतापामध्ये कायदा हातात घेणे योग्य नाही. असे फडणवीस म्हणाले.
मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणातून कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्यात याचा शोध घ्यावा लागेल. जाणूनबुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे हे कोण कारीत आहे, हे तपासून बघावे लागेल. - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जमावावर लाठीचार्ज : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या आंदोलनादरम्यान मटण मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड परिसरात तणाव निर्माण झाला होता. जमाव देखील आक्रमक झाला होता. त्यामुळे प्रशासनाला थोडी आक्रमक भूमिका घ्यावी लागली होती. पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज देखील केला होता. निर्माण झालेल्या गोंधळामुळे अनेक आंदोलक जखमी देखील झाले होते. परंतु आता मात्र आंदोलन स्थळावरील परिस्थिती निवळलेली आहे. जमाव पांगवण्यात व कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे.
हेही वाचा -