कोल्हापूर - दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार कोल्हापुरात देखील दारूची दुकाने सुरू करण्यासंदर्भात आदेश जारी केले होते. त्यानुसार सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये कोल्हापूरात दारूची दुकाने चालू ठेवता येणार आहेत. त्यामुळे गेल्या 40 दिवसांपासून घसा कोरडा असलेल्या तळीरामांनी आज सकाळीच दारूच्या दुकानांसमोर गर्दी केल्याचे पहायला मिळाले. शेकडोंच्या संख्येने तळीराम दुकानाबाहेर फुटपाथवर थांबले होते.
हेही वाचा... #LOCKDOWN : राज्यात दारू विक्रीला परवानगी; काही ठिकाणी गर्दी तर काही भागात बंदी !
महसूल मिळवण्यासाठी राज्यात दारू विक्री सुरू करावी, अशी भूमिका सरकारने घेतली. त्यानुसार आज राज्यात रेड झोनसह सशर्त दारू विक्रीला सुरुवात होणार आहे. मात्र, राज्यात काही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. कोल्हापूरात मात्र दारू विक्री होणार असल्याने मद्य प्रेमींनी सकाळपासूनच दारूच्या दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या.