कोल्हापूर Virat Kohli Cutout in Kolhapur : मायदेशात होत असलेल्या यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं सलग तीन सामने जिंकत विजयाची हॅटट्रिक केलीय. यानंतर आज भारत विरुद्ध बांगलादेश सामना होत असल्यानं क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलाच उत्साह पहायला मिळतोय. फुटबॉलची पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात क्रिकेटचा फिव्हर चढल्याचं चित्र पाहायला मिळतय. कारण कोल्हापुरातील निवृत्ती चौकात विराट कोहलीच्या चाहत्यांनी पंधरा फुटांचा कटआउट उभारून भारतीय संघानं सलग चौथा विजय साकारावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आयसीसी विश्वचषक उंचावण्यची आशा : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघानं विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाला पराभूत करत स्पर्धेत आपलं तगडं आव्हान निर्माण केलंय. अफलातून फॉर्म मध्ये असणारा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि तडाखेबंद फलंदाज विराट कोहली यांच्या चाहत्यांची देशभरात कमी नाही. त्यातच विराट कोहलीच्या फलंदाजीचे चाहते असलेल्या कोल्हापुरातील क्रिकेट शौकिनांनी राणा दा स्पोर्ट्स गांधी मैदान यांच्यावतीनं भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी निवृत्ती चौकात 15 फूट कट आउट उभा केलाय. आजचा बांगलादेश विरुद्धचा सामना भारत जिंकेलंच मात्र भारतीय संघच यंदाचा आयसीसी विश्वचषक उंचावेल अशाही भावना यावेळी क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
फुटबॉलच्या पंढरीत वर्ल्डकप फीव्हर : गतवर्षी कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पार पडली होती. त्यावेळी क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलवर प्रेम करणारे कोल्हापूरात अनेकजण पहायला मिळाले होते. फुटबॉलमधील परदेशी खेळाडू मेस्सी, नेमार, रोनाल्डो यांचे कट आउट कोल्हापुरातील गल्ली-गल्लीत लावण्यात आले होते. आता क्रिकेट विश्वचषक सुरू असल्यांन फूटबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात क्रिकेटप्रेमही तितकेच आहे. भारतीय संघानं विश्वचषक जिंकावा, 2011 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची पुनरावृत्ती करावी यासाठी विराट कोहलीचा कटआउट उभारून भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :
- World Cup 2023 IND vs BAN : सलग चौथ्या विजयासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया; मात्र सामन्यात येऊ शकतो पावसाचा व्यत्यय?
- Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं अफगाणिस्तानला लोळवलं, १४९ धावांनी मोठा विजय
- Cricket World Cup 2023 : गुणतालिकेत कोणता संघ अव्वल? तर सर्वाधिक धावा आणि बळी कोणाच्या नावावर, वाचा सविस्तर