कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाहीये. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कोल्हापूरमध्ये अजही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दररोज एक हजारांहून अधिक रुग्ण आढळत असल्याने, प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. गेल्या 24 तासांतही कोल्हापूरात एकूण 1 हजार 640 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1 हजार 397 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 हजार 780 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 73 हजार 50 वर पोहचली आहे.
निर्बंध शिथिल केलेल्या 5 दिवसांत कोरोना रुग्णांची सख्या वाढली
गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूरमधील व्यवसाय बंद होते. मात्र, व्यापार्यांचा होत असलेला तीव्र विरोध पाहता प्रशासनाने पाच दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध शिथिल केले होते. या पाच दिवसांमध्ये रुग्ण संख्या वाढीचे प्रमाण पाहून निर्बंध शिथिल कायम ठेवायचे की पुन्हा कडक निर्बंध लावायचे याबाबत विचार करण्यात येणार होता. मात्र, काही केल्या कोल्हापुरातील रुग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे आजपासून कोल्हापुरातील निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. शिवाय केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेमध्ये सुरू असणार आहेत. इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, निर्बंध शिथिल केल्यानंतरच्या पाच दिवसांत तब्बल 6 हजार 481 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच, 6 हजार 372 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, 108 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
कोरोना नियम पायदळी
एकीकडे कोल्हापुरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, जिल्ह्यातील नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यावर प्रशासनाकडून कारवाईही होत आहे. गेल्या, तीन महिन्यांत जवळपास 3 कोटी 77 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रशासनाकडून सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, रुग्णसंख्या काही कमी होत नाही. त्यामुळे प्रशासन चांगलेच चिंतेत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील जवळपास 11 लाख नागरिकांचे लसीकरणही नियमीत सुरू आहे. आता नागरिकांनीही पुढचा धोका ओळखून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारी
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 73 हजार 50 वर पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 66 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी म्हणजेच 39 इतकी होती. तर, एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 780 वर पोहोचली असून, एकूण मृतांची संख्या 5 हजार 4 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या
1 वर्षाखालील - 299 रुग्ण, 1 ते 10 वर्ष - 6382 रुग्ण, 11 ते 20 वर्ष - 14011 रुग्ण, 21 ते 50 वर्ष - 99885 रुग्ण, 51 ते 70 वर्ष - 41663 रुग्ण, 71 वर्षांवरील - 10810 रुग्ण, जिल्ह्यात असे एकूण 1 लाख 73 हजार 050 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या
1) आजरा - 45242), भुदरगड - 45823), चंदगड - 35604), गडहिंग्लज - 61515), गगनबावडा - 6726), हातकणंगले - 190097), कागल - 60808), करवीर - 257669), पन्हाळा - 894510), राधानगरी - 416311), शाहूवाडी - 402312), शिरोळ - 10742 13), नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 1893314), कोल्हापुर महानगरपालिका - 4741815) इतकी रुग्णसंख्या आहे.