ETV Bharat / state

कोल्हापुरात विनाकारण फिरणाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

कोल्हापुरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसेच जप्त केलेल्या वाहनांना मिळवण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

kolhapur
कोल्हापूर
author img

By

Published : Jun 1, 2021, 5:22 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्यांना आता जिल्हा प्रशासनाने चांगलीच अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची जाग्यावरच कोरोना चाचणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी पोलीस तपासणी नाका आहे, त्या ठिकाणी आता आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात येणार आहे. त्या माध्यमातूनच विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच जप्त केलेल्या वाहनांना मिळवण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केले आहे.

कोल्हापुरात विनाकारण फिरणाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

विनाकारण फिरणाऱ्यांमुळे गर्दी

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशी परिस्थिती असताना देखील शहर आणि जिल्ह्यातील बाजारपेठांमधील गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. तरीही त्याला यश येत नसल्याचे चित्र आहे. काही नागरिक शुल्लक कारण सांगून रस्त्यावर फिरत आहेत. त्यावर आता पोलीस, जिल्हा प्रशासनाने योग्य पावले उचलली आहेत.

'प्रशासनाने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी जागेवरच करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तू, तसेच भाजी विक्री व प्रशासनाने परवानगी दिलेली दुकाने सुरू आहेत. त्यानंतर संचारबंदी लागू असूनही अनेक जण विनाकारण फिरताना आढळून येत आहेत. त्यांना लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे', असे शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - अनोखा विवाह.. अनाथ मुलीच्या लग्नाचा खर्च उचलला ग्रामपंचायतीने, कन्यादान केलं पोलीस अधिकाऱ्याने तर मामा झाले विस्तार अधिकारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.