ETV Bharat / state

satej patil Reaction : जे भाजपमध्ये गेलेत, ते जुन्या नेत्यांच्या डोक्यावर बसलेत - सतेज पाटील - satej patil Reaction

कोल्हापूरमधील काही नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2014 मध्ये ज्यांना भाजपमध्ये जायचे होते ते गेले आहेत. आता कोणाला जायची इच्छा नाही. आता आमच्यातले कोणीही भाजपमध्ये जाणार नाहीत. कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र मिळून काम करत आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

Congress leader satej patil
सतेज पाटील
author img

By

Published : Jun 24, 2023, 9:43 PM IST

माहिती देताना सतेज पाटील

कोल्हापूर : गेल्या काही वर्षात केंद्रातल्या सरकारचा दबावाचा आणि टार्गेट करून सुरू असलेल्या राजकारणाला विरोध झाला पाहिजे. तसेच भाजप सध्या देशातील राजकारण वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात लोकशाही आहे आणि लोकांना न्याय देणे गरजेचे आहे. यासाठी सर्व विरोधी पक्ष समर्पक अशी आघाडी करत आहेत, याचा आनंद आम्हाला आहे. तसेच ही आघाडी भक्कम होईल याचा विश्वास देखील आम्हाला आहे, असे काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणाले. तसेच भाजपने सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत, असे जे वातावरण तयार केले होते त्याला कुठेतरी छेद करण्यात आला आहे, असे ते यावेळी म्हणाले.

या विषयांवर भाजप सरकार बोलत नाही : आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर बिहार येथील पाटण्यात प्रमुख विरोधी नेत्यांची बैठक पार पडली. यासंदर्भात बोलताना सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही वर्षात केंद्रातल्या सरकारचा दबावाचे आणि टार्गेट करून सुरू असलेल्या राजकारण याला विरोध झाला पाहिजे. महागाई आणि बेरोजगारीवर भाजप सरकार बोलत नाही. ही लोकशाही आहे लोकांना न्याय देणे गरजेचे आहे. यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत समर्पक अशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून भाजपने सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत असे जे वातावरण तयार केले होते त्याला कुठेतरी छेद करण्यात आला आहे. छोट्या मोठ्या ज्या काही गैरसमज असतील त्या लवकरच दूर होतील, आमची ही आघाडी भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

भाजपमध्ये गेलेल्या लोकांची परिस्थिती? येत्या काही दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील बडे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे भाजप खासदार धनंजय महाडिक म्हणाले होते. याबाबत सतेज पाटील म्हणाले, 2014 मध्ये ज्यांना भाजपमध्ये जायचे होते ते गेलेले आहेत, आता कोणाला जायची इच्छा नाही. कोल्हापुरात जुन्या भाजपच्या नेत्यांच्या डोक्यावर नवीन लोक येऊन बसले आहेत. अजून किती जणांना बसवणार आहेत? जुन्या भाजपच्या लोकांच्या हातातून नवीन लोकांनी सर्व ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आणखी घेऊन जुन्यांना पूर्ण बाजूला जायचे आहे का? याचा त्यांनी विचार करावा. मात्र काँग्रेस मधील कोणीही भाजपमध्ये जाणार नाही. कोल्हापुरात महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत आहोत. भाजपमध्ये गेलेल्या लोकांची परिस्थिती काय आहे हे सर्वांना दिसत आहे. प्रमुख नेत्यांना डीपीडीसी पद दिला जात आहे, यावरून भाजप त्यांचे किती सन्मान करत आहे हे दिसून येत आहे.

पक्षाला डॅमेज करण्याचा प्रयत्न : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र पक्ष म्हणून पक्षाची भूमिका वरिष्ठ मंडळी घेत असतात. कर्नाटक निवडणुकानंतर सर्व समोर येत आहेत. ज्यामध्ये काँग्रेसचा टक्का वाढलेला दिसत आहे. यामुळेच काँग्रेसमध्ये काही चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत का? असे दाखवून देत पक्षाला डॅमेज करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदा संदर्भात जो काही निर्णय असेल तो, योग्य वेळ आल्यावर येईलच. मात्र सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आणणे हे आमचे मुख्य टार्गेट आहे. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री हे उद्या सांगली दौऱ्यावर येत आहेत. सिद्धरामय्या हे धनगर समाजाचे नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. त्यांना लवकरच कोल्हापूरसाठी देखील आमंत्रित करणार आहोत असे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. MLA Satej Patil demand : गोकुळचे लेखापरीक्षण केवळ सध्याचेच का ? गेल्या पंचवीस वर्षापासूनचे करा, सतेज पाटील यांची मागणी
  2. PM Care Fund Scam : पीएम केअर फंडाचा निधी गेला कुठे.? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
  3. Uddhav Thackeray : आम्ही कोणाच्या घरावर जात नाही, फडणवीसांनी आपले घर सांभाळावे- उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.