ETV Bharat / state

महागाईच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसची निदर्शने, मोदी सरकारविरोधात घोषणा - कोल्हापूर काँग्रेस बातमी

देशात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार झाले आहेत. घरगुती गॅस तसेच खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचीही प्रचंड महागाई वाढली आहे. महागाई कमी होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी म्हटले.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Jul 12, 2021, 3:49 PM IST

कोल्हापूर - केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि. 13 जुलै) निदर्शने करण्यात आली. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. शिवाय जोपर्यंत देशातील महागाई कमी होत नाही तोपर्यंत काँग्रेसकडून आंदोलन सुरूच राहील, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटले. दरम्यान, या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि आंदोलाकडे लक्ष वेधण्यासाठी वासुदेव आणि टांगाही आणण्यात आले होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली.

बोलताना आमदार पाटील

महागाईचा भस्मासूर; जोपर्यंत सर्वसामान्यांना दिलासा नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही

यावेळी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, जेव्हापासून देशात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासून सातत्याने महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार झाले आहेत. घरगुती गॅस तसेच खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचीही प्रचंड महागाई वाढली आहे. या महागाईमुळे जनतेचे जगणेही मुश्कील झाले आहे. सातत्याने वाढत असलेल्या या किंमतीमुळे आता देशातील जनता गप्प बसणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा. महागाई कमी होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असेही ऋतुराज पाटील यांनी यावेळी म्हटले.

यावेळी, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत असगावकर यांसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायकल रॅली रद्द

वाढलेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेसने निदर्शनात असेच सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने सायकल रॅली रद्द करून केवळ निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा - 17 जुलैपासून पुन्हा सुरू होणार कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.