कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित भरत कुरणे आणि सचिन अंदुरे यांनी जामीनासाठी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दखल केले. आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी आज कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या खंडपीठासमोर जामीनासाठी अर्ज दाखल केले. या दोघा संशयितांच्या जामीन अर्जावर 17 जुलैला सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2015 साली कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑगस्ट 2013 साली खून केला होता. याप्रकरणी दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी भारत कुरणे याला एसआयटीने 1 डिसेंबर 2018 रोजी अटक केली होती. कॉ. पानसरे यांच्या हत्येसाठी त्याने दुचाकी आणि पिस्तूल पुरवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते.