कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाई विरोधात संपुर्ण राज्यात पडसाद उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला कोल्हापूर शहरात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. तसेच पोलीस बंदोबस्तही मोठ्य प्रमाणात तैनात केलेला होता.
हेही वाचा - आम्ही पवार साहेबांसोबत जाणारच..! राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल
कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली होती. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. रॅली दरम्यान शहरात उघडी असणारी दुकाने कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने बंद करण्यास सांगितली यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
हेही वाचा - शरद पवारांना अडचणीत आणणारी ‘ईडी’ नक्की आहे तरी काय?
शिखर बँक घोटाळाप्रकरणी तब्बल २५ हजार कोटींचे कर्ज वाटल्याप्रकरणी तब्बल ७० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यात शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारी लोक, ही दडपशाही योग्य नाही - नवाब मलिक