ETV Bharat / state

ईव्हीएममधून जादा मते निघालीच कशी? शेट्टींची निवडणूक आयोगाकडे तक्रार - ईव्हीएम मशीन

हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर ईव्हीएम मधून ४५९ मते जादा निघाली त्यामुळे राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रार केली आहे.

राजू शेट्टी
author img

By

Published : May 31, 2019, 12:38 PM IST

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जवळपास १ लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, आता शेट्टींनी निवडणूक आयोगाकडे मतमोजणीत फेरफार झाल्याची तक्रार केली आहे. मतमोजणीनंतर ४५९ मते ईव्हीएममधून जादा निघाली असल्याचे सांगत त्यांनी ही तक्रार केली आहे.

हातकणंगलेत ईव्हीएमद्वारे १२ लाख ४५ हजार ७९७ एवढे मतदान झाले. तर ईव्हीएम मधून मोजलेली मते ही १२ लाख ४६ हजार २५६ इतकी आहेत. या फरकाचे कारण काय? यासंदर्भात शेट्टींनी निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. या सर्वांचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी आयोगाकडे केली आहे.

हातकणंगले मतदारसंघात शेट्टी यांना जवळपास १ लाख मतांनी शिवसेनेच्या नवख्या धैर्यशील माने यांनी पराभूत केले होते. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर ईव्हीएम मधून निघाली 459 मते जादा : निवडणूक आयोगाकडे शेट्टींनी केली तक्रार

अँकर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी जवळपास एक लाख मतांनी पराभव केला. मात्र आता राजु शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीत फेरफार झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मतमोजणीनंतर 459 मते ईव्हीएम मधून जादा निघाली असल्याचे सांगत त्यांनी ही तक्रार केली आहे.

व्हीओ :  निवडणूक आयोगाला तक्रार करत राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे की, ईव्हीएम द्वारे झालेले मतदान 12 लाख 45 हजार 797 एवढे आहे. तर ईव्हीएम मधून मोजलेली मते ही 12 लाख 46 हजार 256 इतकी आहेत. या फरकाचे कारण काय याविषयी त्यांनी निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. या सर्वांचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांचा जवळपास एक लाख मतांनी पराभव झाला. शिवसेनेच्या नवख्या धैर्यशील माने यांनी त्यांना पराभूत केले. लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्याच्या एक आठवड्यानंतर राजू शेट्टी यांना हे निदर्शनास आल्यानंतर हा नवीन सवाल उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.