कोल्हापूर - राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले नसल्याने कोल्हापुरातील अनेक कॉलेज आज सुरू करण्यात आली नाहीत. तर शिवाजी विद्यापीठाकडून द्वितीय आणि तृतीय वर्षाचे निकाल लागले नसल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महाविद्यालय सुरू करत असताना विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच पन्नास टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र शिवाजी विद्यापीठातील द्वितीय आणि तृतीय वर्षातील निकाल अद्याप लागले नसल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच अनेक विद्यार्थ्य़ांनी अद्याप कोरोना प्रतिबंध लस घेतली नसल्याने आज महाविद्यालयात सन्नाटा पाहायला मिळाला. द्वितीय आणि तृतीय वर्षाचे निकाल लागले नसल्याने केवळ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वर्गात उपस्थिती लावली होती. तर द्वितीय आणि तृतीय वर्षाचे वर्ग नियमित सुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.