ETV Bharat / state

'आता तासाभरातच मिळणार कोरोनाचा अहवाल; कोल्हापुरात दोन लॅब होणार सुरू'

कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी संशयितांचे स्वॅब मिरजला पाठवावे लागत होते. मात्र आता जिल्ह्यामध्ये या दोन लॅब सुरू होत असल्याने कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्वयंपूर्ण होईल, असेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले.

Kolhapur
कोरोना तपासणी कक्ष
author img

By

Published : Apr 22, 2020, 11:36 AM IST

कोल्हापूर - कोरोना तपासणीच्या दोन लॅब शहरात सुरू होणार आहेत. त्यापैकी एक लॅब आजपासून सुरू होणार असून सीपीआरमध्ये त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल आता तासाभरात मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोरोना संशयितांच्या स्वॅब मिरज येथील लॅबमध्ये पाठविण्यात येत होता. मात्र तेथील संख्येबाबत पडणारी मर्यादा लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन नवीन लॅब सुरू करण्यात येत आहेत. त्यापैकी आज एक लॅब कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयसीएमआरला त्याची नोंदणी सुद्धा पूर्ण झाली आहे. दुसरी लॅब शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 24 ते 25 एप्रिलदरम्यान कार्यान्वित होईल. त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये या दोन लॅब सुरू होत असल्याने कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्वयंपूर्ण होईल, असेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी म्हटले.

जिल्ह्यांमध्ये आज दहा कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आणखी एका महिला रुग्णाचा पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुसरा तपासणी अहवाल सुद्धा पाठवण्यात येईल. उर्वरित रुग्णांपैकी तीन रुग्ण हे शाहूवाडी तालुक्यातील उचतमधील आहेत. दोन रुग्ण मुंबईहून कर्नाटककडे जाणाऱ्या कंटेनरमधील आहेत. इचलकरंजीमध्येही दोन रुग्ण आहेत. या सर्वांवर आता सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.